Chhatrapati Shivaji Maharaj Real Photo | Shivaji maharaj image| Original photo of shivaji maharaj in London Museum | Digital Infopedia

                नमस्कार, Digital Infopedia आज तुम्हाला सोशल मीडिया वर छत्रपती शिवाजी महाराजांचा लंडन संग्रालयातील खरा फोटो म्हणून व्हारयल पोस्ट मागील रिऍलिटी चेक करून ती पोस्ट खरी आहे कि खोटी हे सांगणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाते. त्यामुळे लोक महाराजांच्या  नावाने काही  पण गोष्टी या सोशल मीडिया वर पोस्ट करतात. लोक हे सुद्धा बघत नाही कि ती पोस्ट खरी आहे कि खोटी फक्त लाईक्स  आणि followers साठी लोक Fake  News  सुद्धा पसरवताय.  चला आपण आता बघूया कि महाराजांचा खरा फोटो म्हणून व्हायरल झालेली पोस्ट कितपत खरी आहे. 

Original Photo of Shivaji Maharaj
Original photo of Shivaji Maharaj in London Museum

                        सोशल मीडिया वर व्हायरल पोस्ट मध्ये काय दावा केला आहे ते बघूया. 

   दावा:  छत्रपती शिवाजी महाराजांचा हा खरा फोटो आहे आणि हा फोटो लंडन संग्रालयात ठेवलेला आहे.  
पोस्ट मध्ये दाखवलेला फोटो हा तुम्ही खाली बघू शकतात. 

Real photo of shivaji maharaj
Real Picture of Shivaji Maharaj

            वास्तविकता : लंडन संग्रालयात छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र आहे हे खरे आहे पण पोस्ट मध्ये दाखविल्याप्रमाणे चित्र हे लंडन संग्रालयात नाही. म्हणून पोस्ट मध्ये केलेला दावा आहे पूर्णपणे खोटा आहे . तुम्ही जर महाराजांचे चित्र म्हणून हि खोटी पोस्ट शेअर करत असाल तर सावधान तुम्ही एक fake  news   पसरवत आहे.

  • Original photo of Shivaji Maharaj in London Museum

                    जेव्हा आम्ही या चित्राचा शोध " ब्रिटिश म्युझियम " या वेबसाईटवर घेतला तेव्हा आम्हला या चित्रासह पेंटिंग आढळली नाही. लंडन संग्रालयात छत्रपती शिवाजी महाराजांची चित्रकला आहे ही गोष्ट खरी आहे, तथापि लंडन संग्रालयात असलेल्या चित्रातील चित्र व्हायरल पोस्ट मध्ये दर्शविले नाही. "ब्रिटिश म्युझिअम" या वेबसाईट च्या "भारतीय राजकुमारांचे पोर्ट्रेट" अल्बमच्या आत एक छत्रपती शिवाजी पेंटिंग आहे आणि ती पेंटिंग तुम्ही खाली बघू शकतात. 

Shivaji maharaj portrait in Landon Museum
Credit : British Museum Landon 

                    छत्रपती शिवाजी महाराजांच्या  खऱ्या फोटोचा शोध घेताना आम्हाला असाच एक फोटो "भारत ज्ञान" या ब्लॉग वेबसाईट  वर प्रकाशित झालेल्या लेखात सापडला. इतिहासकार व्ही. एस. बेंद्रे यांनी शोधलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव थेट स्केच हा  या व्हायरल फोटो मध्ये नमूद केला गेला आहे.  परंतु आम्हाला आढळले कि हि चित्रकला व्ही. एस. बेंद्रे यांनी शोधलेली नाही . वासुदेव सीताराम बेंद्रे हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध इतिहासकार आहेत, जे छत्रपती  संभाजी महाराज, संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज याच्या संशोधन आणि शोधांसाठी प्रसिद्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा फोटो हा ज्याला मिळाला तीच ती व्यक्ती इ.स. 1664 मध्ये सुरतचे डच गव्हर्नर वॉंन  व्हॅलेंटाईन यांनी छत्रपती शिवाजी  महाराज आणि इतर राजपुतांच्या चित्रांना सुरवात केली 

                    युरोपमधील त्यांच्या संशोधनांदरम्यान, वासुदेव सीताराम बेंद्रे यांना  हि चित्रे सापडली आणि 1993 मध्ये प्रथमच प्रकाशित झाली. हे चित्र प्रकाशित  होईपर्यंत बहुतेक लोकांनी मुस्लिम सरदारांच्या चित्रांचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराज  यांच्या चित्राला दिले, वासुदेव सीताराम बेंद्रे यांनी प्रकाशित केलेली चित्रे आजही अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे चित्र म्हणून ओळखले जाते.  व्ही. एस. बेंद्रे यांनी प्रकाशित केलेली चित्रे तुम्ही खाली बघू शकतात. 


shivaji maharaj original photo

व्ही. एस. बेंद्रे यांनी प्रकाशित केलेली चित्रे . 

चित्र क्रमांक 1.  Shivaji Maharaj sketch by Von Valentyn

Image Credit: www.wikipedia.org


Shivaji Maharaj original photo
व्ही. एस. बेंद्रे यांनी प्रकाशित केलेली चित्रे . 

चित्र क्रमांक 2. Live sketch of Shivaji Maharaj 

Image Credit www.bharatgyanblog.wordpress.com


            या सर्व गोष्टीवरून हे सिद्ध होत की व्हायरल पोस्ट मध्ये केलेला दावा हा खोटा आहे.  लंडन संग्रालयातील चित्र आणि पोस्ट मधील  चित्र हे खूप वेगळे आहे.  मित्रानो असल्या खोट्या अफवांना बळी पडू नका. तुम्हाला माहिती आवडली असेल तर ही  माहिती जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तुम्ह्लाला आचर्यचकित करणारे फॅक्टस माहिती करायचे  असतील तर आताच आमच्या इंस्टाग्राम पेज ला फॉलो करा. धन्यवाद!