Unknown Dark Secrets of Indian Independence | Subhash Chandra Bose history | Indian independence movement | Digital Infopedia
नमस्कार, Digital Infopedia आज तुम्हाला भारताला स्वातंत्र्य कसे मिळाले यामागील खरा इतिहास सांगणार आहे जो आपल्याला शाळांमध्ये शिकविला गेला नाही. कडक उन्हामध्ये लाठीचार्ज आणि मनामध्ये एक आशेची किरण, केव्हा मिळेल स्वातंत्र्य, या जन्मात स्वातंत्र बघता येईल की नाही, हे सर्व चित्र भारत स्वातंत्र्य होण्याच्या आधीचे होते. पण जेव्हा पण आपण भारताच्या स्वातंत्र्य या विषयावर बोलतो तर जास्तीत जास्त मोहनदास करमचंद गांधी, नेहरू, सरदार पटेल , डॉ. आंबेडकर आणि सुभाषचंद्र बोस हीच नावे आपल्याला जास्त ऐकायला येतात पण यांना सोडून आणखी एक असे नाव आहे ती व्यक्ती जर नसती तर कदाचित भारत आणखी काही वर्षे ब्रिटिशांच्या गुलामी मध्येच राहिला असता. चला तर बघूया की कोण आहे ती व्यक्ती आणि कसा त्या व्यक्ती ने भारताला स्वातंत्र्य करण्यात मोठं योगदान दिले.
आता बघू भारत स्वातंत्र्य करण्यासाठी योगदान दिलेल्या तीन व्यक्ती, या तीन व्यक्तींपैकी एक व्यक्ती आहे महात्मा गांधी, ज्यांनी अहिंसा आणि सत्य च्या मार्गाने स्वातंत्र्य चळवळी सुरू केल्या. दुसरी व्यक्ती आहे नेताजी सुभाषचंद्र बोस, ज्यांनी इंग्रजांना हिंसेच्या मार्गाने हरविले, पण तुम्हाला तिसऱ्या व्यक्ती चे नाव एकूण धक्का बसेल आणि त्या व्यक्ती चा उल्लेख स्वातंत्र्य भारताच्या इतिहास खूपच कमी मिळतो, ही व्यक्ती पूर्ण जगाच्या इतिहासात सर्वात क्रूर आणि अत्याचारी तानाशाह म्हणून ओळखली जाते त्या व्यक्तीचे नाव Adolf Hitler ( एडॉल्फ हिटलर). विश्व युद्ध 2 चा सर्वात मोठा शत्रू हा भारतासाठी फायदेशीर ठरला. चला आता पूर्ण इतिहास बघू.
लहानपणापासून जेव्हा पण स्वातंत्र्याचा विषय येतो तेव्हा सर्वात आधी नाव हे महात्मा गांधी यांचेच येते. तुम्ही कधी विचार केलाय का ? की का इतिहास लिहिणारे आणि शिकवणारे जास्त करून महात्मा गांधी यांनाच जास्त सन्मान देतात बाकी स्वातंत्र्य सेनानींबद्दल आपल्याला जास्त माहिती सुद्धा नाही. तुमच्या या प्रश्नाचे उत्तर आमचा पूर्ण लेख वाचल्यावर कळेल आम्ही तुम्हाला पूर्ण फॅक्टस आणि research नुसार भारताचा खरा इतिहास सांगणार आहोत.
- Unknown Dark secrets of Indian independence.
भारत स्वातंत्र्य करण्यासाठी इतिहासात केलेली महत्वाची कामे ती बघूया.
- Mahatma Gandhi history
महात्मा गांधी.
महात्मा गांधी यांनी इंग्रजांसोबत लढण्यासाठी सत्य आणि अहिंसा मार्ग निवडला. महात्मा गांधी यांनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने चालून इंग्रजांच्या प्रणालीला (System) आणि अर्थव्यवस्थेला मोठी इजा पोहचविली. गरिबी आणि भूकमारी ही वाढत होती लहान मुले ही एक वेळच्या जेवणासाठी मजबूर होते. महात्मा गांधींच्या 1917 चंपारण्य आंदोलनानंतर इंग्रजांना शेतकऱ्यांच्या नापीक जमिनीची नुकसान भरपाई द्यावी लागली, यासोबतच इंग्रज हे आपल्याच वस्तू आपल्याच माणसांना विकण्याचा सुद्धा कर (Tax) घेत होते म्हणून गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह करून इंग्रजांना धडा शिकवला.
गांधींनी दुसरा हमला हा इंग्रजांच्या सरकारी कार्यालयात केला त्यांनी असहयोग आंदोलन ( Non- cooperation movement)सुरू केले यात भारतीय वकिलांनी कोर्ट,शिक्षकांनी शाळा आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारी कार्यालयाचा त्याग केला.या असहयोग आंदोलनाला 6 लक्ष च्या वर लोकांनी पाठींबा दिला पण यामुळे इंग्रजांची अर्थव्यवस्था ठप्प झाली त्यामुळे इंग्रजांनी रागात येऊन खूप हिंसा केली 6 हजार लोक मृत्युमुखी पडले, गांधीजींना जेल मध्ये टाकले आणि इथेच हे आंदोलन इंग्रजांनी दाबून टाकले पण यातून लोक खूप भडकले प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र मागत होता .याचाच फायदा घेऊन गांधीजींनी 1942 मध्ये पुन्हा लोकांना भडकविले आणि म्हणाले जो पर्यंत स्वातंत्र्य नाही मिळणार तो पर्यंत कोणीच घरीं बसणार आणि आणि काम ही करणार नाही.
पण गांधीजींचे हे अहिंसावादी आंदोलन अचानक हिंसक बनू लागले, लोकांनी सरकारी कार्यालये पेटवली, रेल्वे च्या पट्टरी उखडून टाकल्या, आणि इंग्रजांवर गोळीबार सुरू झाला, इथंच इंग्रजांना माहिती पडलं की त्यांचा वाईट वेळ आला आहे. गांधीजींच्या आंदोलनांमुळे लोकांना नुकसान भरपाई मिळू लागली, दैनंदिन जीवनातील करांपासून (Tax) सुटका मिळाली, दैनंदिन जीवनातील वस्तू कमी भावात मिळू लागल्या. पण ब्रिटिश सरकार अजून पण गोंधळ घालत होती. आता इथूनच स्वातंत्र्याची खरी लढाई सुरू होणार होती. लोकांना आता एका चापटीचे उत्तर दुसरा गाल पुढे करता न देता इट का जवाब पत्थर से अश्या विचारधारेचा नेता पाहिजे होता. लोकांनी आता नेताजीं सुभाष चंद्र बोस यांना पाठींबा द्यायला सुरुवात केली.
- Subhash Chandra Bose history
नेताजी सुभाषचंद्र बोस
“तुम मुझे खून दो, में तुम्हे आज़ादी दूंगा” ही घोषणाबाजी करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस होते, जे विदेशात असून त्यांनी भारतात त्यांची स्वतः ची आर्मी तयार केली आणि नाव ठेवले आझाद हिंद सेना. नेताजींनी लोकांच्या मनामध्ये इंग्रजांविरुद्ध लढण्याची चिंगारी पेटविली, जेव्हा आझाद हिंद सेनेने इंग्रजांना हरवून अंदमान आणि निकोबार द्वीप जिंकून आझाद भारताची पहिली सुरवात केली तेव्हा लोकांना विश्वास बसला होता आता आपल्याला इंग्रजांना उत्तर हे जसे च्या तसे द्यावे लागेल तेव्हाच आपल्याला स्वातंत्र्य मिळेल. एका बाजूने नेताजींनी लोकांमधील आग वाढविली आणि दुसऱ्या बाजू ने नेताजी एडॉल्फ हिटलर (Adolf Hitler) ला मित्र बनविण्यासाठी प्रयत्न करत होते.
|
जर्मनी मध्ये पूर्ण एक वर्ष घालविल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस आणि Adolf Hitler हे मित्र झाले होते. तुम्हाला प्रश्न पडला असेल नेताजींनी हिलटर सोबत मैत्री का केली ? तर याचे उत्तर असे आहे की नेताजींनी युक्ती चालविली, “दुश्मन का दुश्मन अपना दोस्त”. हिटलर आणि ब्रिटिश हे शत्रू होते याचाच फायदा नेताजींनी घेतला. विश्व युद्ध 2 च्या वेळेस हिटलर हा असा पण ब्रिटिशांसोबत लढत होता,त्यामुळे त्याने नेताजींना पुर्णपणे नाही पण म्हटले नाही आणि पूर्णपणे हो पन म्हटले नाही पण हिटलरने नेताजींना म्हटले की जर ब्रिटेनवर दोघे बाजूने हमले केले तर ब्रिटेन दोघे बाजूंनी लक्ष नाही देऊ शकणार आणि लवकरच हार स्वीकारेल आणि हिटलरने नेताजींना वचन दिले.
हिटलर ने दिलेल्या वचनानुसार Operation Blitz च्या अंतर्गत हिटलरने ब्रिटेन च्या Air base आणि शहरांमध्ये बॉम्ब टाकणे सुरू केले. नेताजी आणि हिटलर चांगले मित्र झाले होते, आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांच्या आकर्षक व्यक्तिमत्वामुळे जपान सोबत पण चांगली मैत्री केली. यामुळे जपान चे प्रधानमंत्री टोजो ने नेताजीसोबत बोलून युद्धात पकडल्या गेल्या सर्व ब्रिटिश आर्मीतील भारतीयांना सोडून दिले आणि south east मधील बाकी भारतीय लोक नेताजींच्या आझाद हिंद सेनेत सामील झाले. नेताजींच्या आझाद हिंद सेनेला हत्यारांपासून तर पैश्यांपर्यंत सर्व काही जपान देत होता.
जपान इतकी मदत करत होता म्हणून आझाद हिंद सेनेने जपनसोबत मिळून बर्मा आणि मणिपूर येथे इंग्रजांविरुद्ध दोन युद्ध लढले पण नेताजींनी आझाद हिंद सेनेला वचन दिले होते की एका वर्षाच्या आत आझाद हिंद सेना ही भारताच्या मातृभूमीवर असेल, आणि त्यांनी त्याचं वचन पूर्ण केलं, जपान ने विश्व युद्ध 2 मध्ये ब्रिटेन ला हरवून अंदमान आणि निकोबार हे महाद्विप नेताजींना देऊन दिले.
नेताजींनी अंदमान आणि निकोबार मध्ये स्वतः ची स्थायी सरकार स्थापन केली, आणि नेताजींच्या या सरकार ला 9 देशांनी मान्यता पण दिली, जपान, जर्मनी, इटली, फिलिपिन्स इत्यादी हे या 9 देशांमध्ये सामील होते. अंदमान आणि निकोबार महाद्विप हे स्वातंत्र्य भारताचा पहिला भाग होते, जिथे पहिल्यांदा तिरंगा फडकला, आणि या स्वातंत्र्य भारताचे पहिले प्रधानमंत्री हे नेताजी सुभाषचंद्र बोस होते, आणि त्यासोबत त्यांच्या सरकार सोबत त्यांची बँक पण होती जिचे नाव होते आझाद हिंद बँक आणि त्यासोबतच नेताजींच्या या सरकार चे स्वतः चे चलन आणि स्टॅम्प सुद्धा होते.
Azad Hind Sena bank, stamp & currency. |
हे सर्व जेव्हा लोकांना भारतामध्ये कळले तेव्हा लोकांच्या मनात नेताजींबद्दल सन्मान वाढू लागला आणि आशेची किरण दिसू लागली, लोक आझाद हिंद सेनेत सामील होण्यासाठी तयार झाले होते आणि नेताजी पण इंग्रजांवर हमला करणार होते तितक्याच 1945 च्या एका सकाळी वृत्तपत्रात एक बातमी छापली जाते की एडॉल्फ हिटलरने आत्महत्या केली. या बातमीमुळे इतिहास पुन्हा बदलणार होता,आणि त्याच वर्षी अमेरिकाने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी शहरांमध्ये न्यूक्लिअर बॉम्ब फेकले आणि त्यामुळे जपान ची अर्थव्यवस्था ठप्प झाली, नेताजींचे दोन सर्वात मोठे समर्थक हे नष्ट झाल्यामुळे नेताजींच्या त्रासामध्ये वाढ झाली, त्यामुळे आझाद हिंद सेनेने इंग्रजांसमोर समर्पण करून दिले आणि लाल किल्यांवर आझाद हिंद सेनेच्या सैन्यावर खटला चालू झाला आणि त्यांना मृत्यू दंड देण्यात आला.
हे सर्व बघून भारतीय लोकांमध्ये एक बदल्याची आग भडकली,ब्रिटिश सैन्यातील भारतीय लोकांनी बगावत करायला सुरुवात केली. लोकांचा आक्रोश बाहेर पडू लागला. या सर्व गोष्टी नेताजींच्या एका गोष्टीला खरं करतात की, “आज़ादी की इच्छा अगर हर भारतीय के दिल मे उठे तो, भारत को आज़ाद होने से कोई नही रोक सकता”. हे सर्व बघून इंग्रजांना समजलं होत की आता ते त्यांच्याच भारतीय सैन्यावर विश्वास ठेवू शकत नव्हते. विश्व युद्ध 2 च्या वेळेस ब्रिटेन पूर्णपणे कंगाल झाला होता इंग्रजांकडे त्यांचा आर्मी सपोर्ट हा शिल्लक राहिला नव्हता, आणि सर्व ठिकाणी असहयोग आंदोलन सुरू होते त्यामुळे इंग्रजांच भारतात जगणे कठीण होणार होते, त्यामुळे इंग्रजनी 14 ऑगस्ट 1947 च्या रात्री भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला. हा झाला आपल्याला स्वातंत्र्य कसे मिळाले याचा पूर्ण इतिहास.
- Read More: Do ghosts exist ? Can Science Prove that ghosts do not exits?
- Read More: How to deals with false FIR
आता मित्रानो तुम्ही विचार करा की विश्व युद्ध 2 च्या वेळेस हिटलर ने ब्रिटेन ला कंगाल नाही केले असते ? जपान आणि जर्मनी सारख्या देशांचा नेताजींना पाठिंबा नाही मिळाला असता तर काय खरंच आपल्याला इतक्या लवकर स्वातंत्र्य मिळाले असते का ? जर्मनी आणि जपान चा पाठिंबा नेताजींना याच्यासाठी मिळाला कारण जपान,जर्मनी आणि नेताजी यांचा शत्रू एकच होता ब्रिटेन. आता जर हिटलर ने नेताजींना मदत केली नसती तर काय नेताजींच्या आझाद हिंद सेनेचे 5600 सैनिक इंग्रजांना हरवू शकते का? आणि दंगे आणि आंदोलनामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले असते का? यांचे उत्तर असे आहे की इंग्रजांनी त्यांना तसेच दाबून टाकले असते जसे ते 200 वर्ष करत आले. म्हणून आपण हे कधीच विसरून चालणार नाही की हिटलर आणि जपान चे भारत स्वातंत्र्य करण्यात मोठं योगदान आहे.
मित्रानो , आम्ही आशा करतो की तुम्हाला माहिती आवडली तुम्हाला तुमचे ज्ञान वाढवण्यात उपयुक्त ठरेल. तुम्हाला जर जगाबद्दल अचंबित करणारे तथ्य माहितीती करायचे असतील तर आमचे इंस्टाग्राम पेज अद्भुत तथ्य मराठी ला आजच फॉलो करा. धन्यवाद!
0 Comments