19 फेब्रुवारी 1630 ला महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर एका बाळाचा जन्म झाला. या बाळाच्या आई चे नाव जिजाबाई भोसले आणि पिता चे नाव शहाजी भोसले होते. जन्मानंतर या बाळाचे नाव ठेवण्यात आले, हे बाळ शिवाई देवीच्या कृपेने झाले होते म्हणून या बाळाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले, जिजाऊ त्यांना शिवबा आणि शिवराय नावाने पण हाक मारायच्या. त्याकाळात शहाजी भोसले हे मुघलांसाठी काम करायचे. त्यामुळे ते घराकडे खूप कमी लक्ष द्यायचे.
शिवरायांसोबत सर्वात जास्त वेळ जिजाबाई ने घालविला. शिवराय लहान असतांनाच जिजाबाई ने त्यांना रामायण पासून तर महाभारत पर्यत आणि महाभारत पासून भगवत गीता आणि बाकी सर्व पौराणिक कथा सांगितल्या. या सर्व गोष्टींमुळे लहानपणापासूनच शिवरायांमध्ये एक स्वाभाविक नेतृत्व करण्याची गुणवत्ता दिसू लागली. एक वेळा छोटे शिवराय हे पुण्याजवळील मावळ या छोट्या गावात गेले तिथे त्यांनी बघितले तिथं सर्व मागासवर्गीय आणि गरीब लोक होते पण या लोकांमध्ये हिम्मत खूप होती.
12 ते 15 वर्षाचे असताना शिवरायांनी मावळ येथील जंगलात आणि गावात 3 वर्ष घालविले आणि बघितलं की या लोकांमध्ये ताकत ही खूप आहे पण यांना कोणी मार्गदर्शन करणारे कोणी नाही. हे लक्षात येताच शिवरायांनी त्यांच्या मित्रांना आणि मावळ मधील लोकांना एकत्र केले आणि त्या लोकांना सांगितले की मराठ्यांना मुघलांचे नोकर म्हणून ओळखले जाते आणि हा जो नोकर आहे आणि जी ही गुलामी आहे ही फक्त एक मानसिकता आहे आणि या गुलामीलाच आपल्याला संपवायचे आहे आणि मराठ्यांना मुघलांपासून स्वातंत्र करायचे आहे.
निजामशाही आणि आदिलशाही यांच्या गुलामीतून मराठ्यांना बाहेर काढायचे आहे म्हणून यांनी गावातील लोकांना तयार केले आणि चाकु काढला आणि स्वतःच्या हाताचे रक्त काढले आणि शंकराच्या शिवलिंग ला त्या रक्ताने रक्ताभिषेक केला आणि घोषणा केली आता आपण सर्व मिळून स्वराज्याची स्थापना करू गुलामी एक मानसिकता आहे तुम्ही गुलाम तुमच्या विचारांमुळे आहे.आता शिवरायांनी म्हणून तर दिले की स्वराज्य स्थापन करू पण त्यासाठी त्यांच्याकडे पाहिजे तितके मनुष्यबळ, संसाधने, निधी, समर्थन, सामर्थ्य आणि युती नव्हती.
तुम्हाला माहिती पाहिजे की शिवाजी महाराज हे एकत्र अवतार होते महाराणा प्रताप यांच्या शौर्याचे आणि चाणक्य च्या कुटील नीतीचे आणि बौद्धिक शक्तीचे. शिवराय हे नेहमी छापा मार युद्ध करायचे त्यालाच आपण गनिमी कावा म्हणतो. शिवरायांच्या गनिमी काव्यामुळेच मुघल त्यांना पहाडी चुहां म्हणायचे. छोट्या सैन्यापासून शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची मोहीम सुरू केली होती आणि स्वराज्य हे दक्षिण पासून तर उत्तर प्रयत्न गुजरात दिल्ली पर्यंत वाढविले.
एक वेळा आदिलशहाने शहाजीराजेंना पकडून कारावासात टाकून दिले. तेव्हा शिवरायांनी खूप दिवस विचार केला काय करावं. तेव्हा त्यानी एक युक्ती केली शाहजहान आणि आदिलशहा ला एकमेकांमध्ये लढवायचे ठरवले. शिवराय लगेच दिल्लीला शाहजहान ला भेटायला गेले आणि त्यांना म्हणाले तुमचे खूप युद्ध होणार आहे दक्षिण मध्ये, तुम्ही जर माझी मदत केली आणि आदिलशाही संपविली तर मी तुमची मदत करेल, हे ऐकताच शाहजहान तयार झाला आणि शाहजहान ने शहाजीराजेंना सोडविले. यातून आपल्या कळत शिवरायांना युद्ध जिंकणं महत्त्वाचे होते युद्ध लढणे नव्हे.
- Who is father of indian navy
काही वेळा तर शिवराय युध्दात सहभागी न होताच ते युद्ध जिंकायचे. शिवरायांनी गुजरात पासून तर कर्नाटक च्या समुद्र किनाऱ्यावर त्यांची समुद्री सेना तयार केली. कारण त्यांना आभास झाला होता की त्यांच्या साम्राज्याला धोका हा फक्त समुद्रापासून आहे. म्हणून च आज शिवरायांना Father of Indian Navy म्हणतात.
- Shivaji Maharaj and Afzal Khan Story in Marathi
त्याकाळात दक्षिण भारतातील तानाशाह आदिलशाह शिवरायांपासून तंग झाला होता,म्हणून आदिलशाह ने त्याचा सेनापती अफझल खान याला शिवाजी ला मारायला पाठविले. अफझलखान ला माहिती होते शिवराय हे खूप चतुर आहे म्हणून त्यांनी शिवरायांना एक पत्र पाठविले. शिवाजी में तुमसे अकेले मिलना चाहता हूँ, संधी करना चाहता हु तुमसे, अकेले मिलोगे मुझसे. शिवरायांनी उत्तर दिले ठीक है अकेले मिल लेते है मुझे कोई समस्या नही है.अफ़ज़ल खान ने बोला नियम ये है कि तुम्हारे पास ना कोई सेना ना मेरे पास कोई सेना, में भी अकेला तुम भी अकेले, ना मेरे पास कोई अस्त्र शस्त्र ना तुम्हारे पास कोई अस्त्र शस्त्र.
|
shivaji maharaj and afzal khan story in marathi |
अफझलखान ला माहीत होतं शिवाजी हा खूप इमानदार व्यक्ती आहे तर आपल्या सर्व अटी स्वीकारून निहस्ते भेटायला येतील. याविचारात अफझलखान खान प्रतापगडावर शिवरायांना भेटायला आला, अफझलखान हा शरीराने शिवरायांपेक्षा अधिक बलवान होता. अफज़ल खान म्हणाला आओ शिवाजी आओ हमसें लगे लग जाओ. जसे शिवराय अफझलखान सोबत मिठी मारत होते तसे अफझलखानाने खंजर काढले आणि शिवरायांच्या पाठीवर वार केले. शिवराय आधीपासूनच तयार होते त्यांनी आतमध्ये चिलखत घातले होते म्हणून अफझलखानाचा वार नाकाम झाला आणि शिवरायांनी वाघनखे काढली आणि अफझलखानाच्या पोटात घुसवून खानाची आतडी बाहेर काढली. शिवराय इथंच थांबले नाही खानाला मारल्यावर खानाच्या सैन्याचे मनोबल तोडून प्रतापगड जिंकला.
प्रतापगड जिंकल्यावर शिवराय थांबले नाही त्यांनी 18 दिवसांच्या अंदर पन्हाळा किल्ला सुद्धा जिंकला. काही दिवसांनी शिवरायांचे युद्ध मिर्झा राजे जयसिंग सोबत झाले , जयसिंग यांनी मुघलांसोबत युती केली होती. शिवराय मिर्झा राजे जयसिंग यांच्यासोबत युद्ध हारले. युद्ध हारल्यानंतर मिर्झाराजे जयसिंग ने शिवरायांकडून पुरंदर चा तह केला या तहातहत शिवरायांचे 23 किल्ले हे मिर्झाराजे जयसिंग ने घेऊन घेतले. 23 किल्ले हातातून गेल्यानंतर सुद्धा शिवराय थांबले नाही त्यांनी काही वर्षांत 360 किल्ले पुन्हा जिंकले.
शिवरायांची लढाई ही कोणत्याही प्रकारे कोणत्या जाती धर्माबद्दल नव्हती. शिवरायांची लढाई ही मुघलांच्या विरुद्ध होती जे की गरीब लोकांवर अन्याय करायचे आणि असे मुघल जे विदेशातून आलेले आहेत. यांची लढाई जर इस्लामविरुद्ध नव्हती जर तसे असते तर त्यांच्या सैन्यात मुस्लिम नसते. शिवरायांच्या सैन्यामध्ये मुस्लिमांचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे.शिवरायांचे काही काही सेनापती, अंगरक्षक, स्वयंपाकी हे मुस्लिम होते.
एक गोष्ट आणखी अशी आहे जी शिवाजींना मुघलांपासून वेगळं करते ती म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत सन्मान. शिवराय हे त्या प्रत्येक स्त्री चा आदर करायचे जी त्यांच्या स्वराज्यात राहायची. शिवरायांनी त्यांच्या सैन्याला पण सांगितले होते की आई,स्त्रिया आणि लहान मुले याना त्रास नाही द्यायचा.त्याकाळी मुघल सैन्य हे युद्ध जिंकल्यानंतर स्त्रियांना उचलून न्यायचे आणि बलात्कार करून मारून टाकायचे गावातील घरे जाळून टाकायचे आणि मंदिरे तोडायचे.
शिवरायांनी त्यांच्या सैन्याला बजावले होते की दुसऱ्या धर्माचा अपमान नाही करण्याचा, परक्या स्त्री कडे वाईट नजरेने नाही बघायचे, आणि जर कोणता मावळा असे करताना पकडला गेला तर त्याला मृत्यू दंड मिळेल. शिवरायांच्या अश्या विचारांमुळे त्याकाळात लोक त्यांच्यासाठी जीव पण द्यायला तयार होते.
प्रश्न: शिवरायांच्या सैन्याला मावळे का म्हणतात ?
उत्तर : शिवरायांच्या सैन्याला मावळे म्हणतात कारण शिवरायांनी मावळ या छोट्याशा गावातून स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि या गावातील लोकांना एकत्र करून स्वराज्य स्थापन केले म्हणून या गावाच्या नावावरून शिवरायांनी सैन्याला मावळे म्हणून हाक मारली.
तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट मध्ये कळवा. माहिती आवडल्यास अधिक शेअर करा. आमच्या वेबसाइट वर भविष्यात येणाऱ्या माहिती वाचण्यासाठी नोटिफिकेशन ऑन करा.
0 Comments