Science behind ghosts/ spirits ? Do ghosts really exist ? Can Science prove that ghosts do not exist - Digital Infopedia
नमस्कार, मित्रानो तुम्हीही लहानपण पासून एक गोष्ट नक्की ऐकत आले असाल, जसे कि आपण या पृथ्वीवर एकटे नाही राहत आपल्या सोबत भूत आणि प्रेत सुद्धा राहतात , पण हे कितपत सत्य आहे याचा तुम्ही विचार केला आहे का ? तुम्हाला तुमच्या मित्रांनी किंवा घरच्यांनी बरेचदा भुतांच्या गोष्टी सांगितल्या असतील किंवा तुम्ही चित्रपटांमध्ये सुद्धा बघितले असेल, या सर्वामुळे खूप जण हे रात्री घाबरतात. म्हणून मित्रानो तुमच्या मधील भुतांची भीती घालवण्यासाठी Digital Infopedia ने भुतांच्या विषयावर research करून एक पूर्ण लेख तयार केला आहे तर चला बघूया. Do ghosts exist ? or Can Science prove that ghosts do not exist ?
धार्मिक ग्रंथ आणि दंतकथा यांच्यामते भूत प्रेत हे एका मृत व्यक्ती ची आत्मा आहे,पण धार्मिक ग्रंथ आणि दंतकथा यामध्ये ही आत्मा खूप शक्तिशाली दर्शविली जाते,पण खरंच ही आत्मा इतकी शक्तिशाली असू शकते का? यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन बघूया.
- Can Science prove that ghosts do not exist ?
विज्ञान म्हणते या जगात जे काही आहे ती सर्व एक ऊर्जा आहे आणि धार्मिक ग्रंथांमध्ये उल्लेख आहे की आत्मा ही एक नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा आहे. पण विज्ञानातील Thermodynamic (थर्मोडायनॅमिक) च्या नियमानुसार ऊर्जा ही कधीही नष्ट केली जाऊ शकत नाही आणि ती बनवली सुद्धा जाऊ शकत नाही, ती फक्त एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करते. Thermodynamic (थर्मोडायनॅमिक) च्या नियमानुसार ऊर्जाला माध्यम बदलवायचे असल्यास ते फक्त तीन प्रकारे बदलते. Conduction (कंडक्शन), Convection (कन्व्हेक्षण), Radiation (रेडिएशन). Conduction (कंडक्शन) मध्ये एक वस्तू गरजेची असते ज्यातून ऊर्जा प्रवास करू शकेल, Convection (कन्व्हेक्षण) मध्ये ऊर्जा हवेमार्फत ट्रान्स्फर होते याच उत्तम उदाहरण म्हणजे Microwaves (मायक्रोवेव्ह).आणि Radiation (रेडिएशन) मध्ये Radio waves (रेडीओवेव्ह) मार्फत ऊर्जा प्रवास करते.
पण जेव्हा व्यक्ती चा मृत्यू होतो तेव्हा त्या मृत शरीरातील सर्व ऊर्जा या तीन प्रकारांमार्फत बाहेर निघून जाते आणि शिल्लक ऊर्जा ही शरीरातील सूक्ष्मजीव, वातावरणातील कीटक आणि शरीरातील रासायनिक प्रक्रियाद्वारे शरीरातून बाहेर फेकली जाते आणि वातावरणात मिसळून जाते. विज्ञानानुसार कोणतीही ऊर्जा ही या पृथ्वीवरील कोणतीही वस्तू तिच्या जागेवरून शक्तीविना (Force/ Power) हलवू शकत नाही त्यामुळे आत्मा कोणाला मारू पण शकत नाही ही फक्त एक कल्पना आहे.
जर आपण असे समजून चाललो की ती एक ऊर्जा आहे तर मग ती आपल्याला विज्ञानानुसार मोजता यायला पाहिजे,जसे आपण बाकीच्या ऊर्जा मोजतो किती प्रमाणात आहे जसे डार्क ऊर्जा( Dark energy). पण आत्मा ची ऊर्जा कोणत्याच प्रकारे मोजता येत नाही कारण ती या जगात अस्तित्वातच नाही.भूत प्रेत हे या जगात असते तर इतक्या हजारो वर्षांमध्ये भूत प्रेत आपल्याला केव्हा ना केव्हा तर दिसले असते.विज्ञानच या जगात सर्व शक्तिशाली आहे आणि या जगात होणारी प्रत्येक गोष्ट हि विज्ञानामुळेच होत आहे.
तुम्ही खूप चित्रपटामध्ये Paranormal Investigators (पॅरानॉर्मल इन्वेस्टीगेटर) यांना काही Devices (डिवायसेस) वापरतांना बघितले आहे ते त्या डिवायसेस द्वारे त्या ठिकाणाची शीतलता मोजतात,पण जर का आत्मा ऊर्जा आहे तर त्यांनी उष्णता मोजायला हवी आणि जर ते शीतलता मोजतात याचा अर्थ ते आत्माला एक Matter (भौतिक वस्तू) समजतात.जर का आत्मा Matter आहे तर ती आपल्याला दिसायला हवी. या सर्व रीसर्च नुसार विज्ञानाने सिद्ध केले आहे की आत्मा ही या जगात अस्तित्वातच नाही.
विज्ञान हे व्यक्ती च्या मृत्यू ची सर्व प्रक्रिया ही आत्मा शिवाय सिद्ध करते त्यामुळे ती आत्मा आपल्या शरीरात सुद्धा नाही असं विज्ञान म्हणतं. आत्मा हे एक काल्पनिक पात्र हे धार्मिक ग्रंथ आणि दंतकथा यांनी तयार केले आहे.त्यामुळे त्याला घाबरण्यासारखे काही सुद्धा नाही.या जगात जे काही सुरू आहे ते सर्व Thermodynamics (थरमोडायनॅमिक) च्या नियमानुसार सुरू आहे पण आत्मा हे पात्र Thermodynamics (थरमोडायनॅमिक) च्या कोणत्याच नियमाचे पालन करत नाही त्याच्यामुळे ते या जगात अस्तित्वातच नाही.
- 21 Gram Theory Explain
Dr.Duncan MacDougall यांनी 1907 मध्ये 21 Gram theory दिली त्यांनी एक प्रयोग केला आणि ते म्हणाले जेव्हा पण व्यक्ती चा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या शरीरातून 21.3 Gram वजन हे कमी होत. त्यांनी हा प्रयोग 6 लोकांवर केला ज्यांची मृत्यू जी लवकरच होणार होती. त्यांच्या या प्रयोगातून त्यांनी असा निष्कर्ष काढला की व्यक्ती मधील आत्मा चे वजन हे 21.3 Gram असते. पण वैज्ञानिकांनी या प्रयोगाला आत्मा सोबत जोडणे चुकीचे ठरविले. वैज्ञानिकाच्या मते जेव्हा व्यक्तीची मृत्यू होते तेव्हा त्याच्या शरीरात काही बदल घडतात. रोजप्रतीकारक शक्ती काम करणे बंद झाल्यामुळे शरीरातील सूक्ष्मजीवांचे प्रमाण हे वाढते आणि ते शरीर आतून नष्ट करू लागतात त्यासोबतच मानवामध्ये Sweat Glands असते त्यामुळे घाम फुटतो आणि energy कमी होत जाते आणि त्यासोबतच मृत्यूच्या वेळी शरीराचे तापमान हे अचानक वाढते फुफ्फुसे रक्त थंड करण्याचे थांबवितात. म्हणून हा 21.3 Gram चा अचानक बदल घडून येतो.
- Read More: How to deals with false allegations ?
- Read More: What is love ? What is the definition of love
- Science prove that ghosts do not exist
या सर्व गोष्टीवरून सिद्ध होते या जगात भूत प्रेत हे नसतात. भूत प्रेत हे फक्त एक काल्पनिक पात्र आहे जे आपल्याला दंतकथा आणि धार्मिक ग्रंथांमध्ये बघायला मिळते आणि जे लोक असा दावा करतात कि त्यांनी भूत बघितले आहे त्यातील काही लोक फक्त भिईटी निर्माण करण्यासाठी खोटे बोलतात. काही लोकांना जे भूत दिसतात ते त्यांच्या अवचेतन मनाची कल्पना असते ती त्यांना त्यांच्या मध्ये असलेल्या भुतांच्या भीतीमुळे दिसते. काही लोक म्हणतात त्यांनी वस्तू हलताना बघितली याच्यामागे पण एक वैज्ञानिक कारण आहे ते म्हणजे Infrasound. Infrasound हि एक प्रकारची आवाजाची तरंगे असतात. हि तरंगे इतकी छोटी असतात कि ते आपल्याला सुद्धा येत नाही. हि तरंगे खराब वातावरण आणि कोणती पण Mechanical वस्तू जसे कि खराब पंखे आणि इंजिन यांच्यापासून तयार होतात.
Infrasound हि आपल्याला ऐकू येत नाही कारण, यांची Frequency हि 18.98 Hz असते आणि आपल्याला 20 Hz च्या वरील Frequency हीच ऐकू येते. Infrasound हे छोटे असल्यामुळे ते आपल्या डोळ्यांच्या संरचनेसोबत संवाद साधतात आणि डोळ्यामध्ये कंपन तयार करतात त्यामुळे आपल्याला वस्तू हलताना दिसतात पण वास्तविक्तेमध्ये वस्तू न हालता तुमच्या डोळ्यांच्या Retina हालत असतात. यावरून सिद्ध होते कि या जगात भूत प्रेत यासारख्या गोष्टी नसतात तो फक्त आपला भ्रम असतो.
तुम्हाला माहिती आवडल्यास जास्तीत जास्त या माहितीला शेअर करा ज्याने भूत प्रेत यामधील लोकांच संभ्रम दूर होईल..आणि या जगातील अद्भुत तथ्य माहिती करायचे असतील तर आमच्या इंस्टाग्राम पेज अद्भुत तथ्य मराठी ला आजच फॉलो करा..धन्यवाद!
0 Comments