The Russian Sleep Experiment | Russian Sleep Experiment Real History | Soviet Sleep Experiment | Digital Infopedia

            नमस्कार, Digital Infopedia आज तुम्हाला विज्ञानाच्या अश्या प्रयोगाबद्दल सांगणार आहे त्या प्रयोगातून तुम्हाला मानवातील राक्षसीवृत्ती कशी वाढत जातेय ते तुम्हाला कळणार आहे. काही वर्षांपासून इंटरनेट वर  The Russian Sleep Experiment च्या नावाने विडिओ हे व्हायरल होत आहे त्यातील तुम्ही काही बघितले पण असतील, किंवा तुम्ही या प्रयोगाबद्दल वाचले असेल. आज आम्ही तुम्हाला या प्रयोगामागील खरा इतिहास सांगणार आहोत.

Soviet Sleep experiment
The Russian Sleep Experiment

                 1940 मध्ये सोव्हिएत युनियन ने दुष्मन सेनेतील 5 वेगवेगळ्या वयाच्या कैद्यांना या प्रयोगासाठी निवडण्यात आले. या 5 कैद्यांना 30 दिवसांसाठी एका खोलीमध्ये बंद करण्यात आले या अटीवर जर तुम्ही सर्व कैदी 30 दिवसांसाठी या खोलीत 30 दिवस न झोपता आमच्या प्रयोगासाठी सहकार्य कराल तर तुम्हाला 31 व्या दिवशी तुमच्या देशात सोडून देण्यात येईल. या सर्व गोष्टी नंतर त्यांना अश्या खोलीत ठेवण्यात आले ज्यामध्ये  जेवणाची सोय, पिण्याचे पाणी, शौचालय, आणि काही वाचण्यासाठी पुस्तके होते पण त्या खोलीत बसण्यासाठी आणि झोपण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिली नाही आणि त्या 5 कैद्यांवर नजर ठेवण्यासाठी आणि प्रयोगाचे निरीक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी दोन One Way Mirror लावण्यात आले, कारण त्याकाळी कोणत्याही प्रकारचे CCTV कॅमेरा नव्हते.

                त्या पाच कैद्यांना झोप येऊ नये म्हणून शास्त्रज्ञांनी त्या खोलीत एक विषारी वायू हा ऑक्सिजन सोबत सोडला. हा वायू हा chemical stimulate पासून बनलेला होता आणि हा वायू कोकेन ड्रग सारखेच काम करतो असे त्या शास्त्रज्ञांचे म्हणणे होते. पाहिले चार दिवस हे निघून गेले होते आणि ते सर्व कैदी हे न झोपता सुध्दा नॉर्मल होते त्यांच्या मध्ये काही जास्त फरक हा शास्त्रज्ञांना निरीक्षणामध्ये आढळून आले नाही. पण पाचव्या दिवसापासून त्या कैद्यांची अस्वस्थता वाढू लागली आणि नवव्या दिवशी त्या कैद्यांपैकी एका कैदीचे मानसिक संतुलन खराब झाले आणि तो 3 ते 4 तास जोर जोराने ओरडू लागला त्याच्या ओरडण्यामुळे त्याच्या गळ्यातील vocal cords हे फुटून गेले.

                शास्त्रज्ञांनी जो वायू सोडला होता त्या वायू चा प्रभाव हा बाकी कैद्यांवर सुद्धा होतांना दिसू लागला. त्यामुळे ते सर्व कैदी हे काही न काही पुटपुटत असत आणि असामान्य हालचाली करू लागले. शास्त्रज्ञ रोज त्या खोलीमध्ये तो विषारी वायू सोडायचे आणि त्या वायू चे प्रमाण हे दिवसेंदिवस शास्त्रज्ञ हे वाढवत होते. एक दिवस त्या कैद्यांपैकी एका कैदी ने त्यांना दिलेले पुस्तक फाडून त्या पुस्तकाची पाने ही काचांवर चिपकविले. यामुळे शास्त्रज्ञांना खोलीच्या आतील हालचाली या दिसत नव्हत्या. यानंतर खोलीमध्ये शांतता पसरली, पण शास्त्रज्ञांना खोलीमधील ऑक्सिजन लेव्हल मुळे खोलीतील हालचाली समजत होत्या.

                   जेव्हा खोलीमधून कोणत्याच प्रकारचा आवाज येत नव्हता तेव्हा शास्त्रज्ञांना असे वाटले की आता ते सर्व कैदी हे मरणाच्या वाटेवर आहे म्हणून त्यांनी त्या खोलीतील तो विषारी वायू हा काढून टाकला आणि ती खोली open केली आणि त्या कैद्यांना शास्त्रज्ञ येताय अशी सूचना केली तसाच खोलीमधून भयानक आवाज यायला सुरुवात झाली आणि त्या कैद्यांमधून एका कैदी ने म्हटले आम्हला स्वातंत्र्य नकोय, आम्हाला इथंच राहायचे आहे, त्या कैद्यांना त्या खोलीत मजा येऊ लागली. ते सर्व कैदी शास्त्रज्ञांना भीक मागू लागले की तो वायू परत खोली मध्ये सोडा, हे ऐकून सर्व शास्त्रज्ञ विचार करायला लागले, की आता काय करायचं?

Soviet Sleep experiment
Russian Sleep Experiment

                     ज्या Morphine च्या एका इंजेक्शन ने व्यक्ती बेशुद्ध होतो असे 8 ते 9 इंजेक्शन दिल्यानंतर पण ते सर्व कैदी हे शुद्धी मध्ये होते आणि डॉक्टरांना विनंती करत होते की ते शुद्धीमध्ये असतांनाच त्यांचे operation करण्यात यावे. जसे जसे डॉक्टर्स operation करत होते तसे तसे ते कैदी जोर जोराने हसत होते. हे operation करतांना 5 पैकी 3 कैद्यांचा मृत्यू झाला. इतके झाल्यानंतर पण या research ला इथं थांबविण्यात आले नाही सोव्हिएत युनियन च्या कमांडर ने या प्रयोगाला आणखी काही वेळ सुरू ठेवण्याचे आदेश दिले कारण त्यांना बघायचे होते की वाचलेल्या दोन कैद्यांना जर परत त्या खोलीमध्ये ठेवले तर काय होईल.

                  शास्त्रज्ञांना आता हा प्रयोग थांबवायचा होता पण कमांडर च्या आदेशामुळे त्यांना हा प्रगोग करावा लागत होता. आता त्या दोन कैद्यांसोबत 3 शास्त्रज्ञांना सुद्धा त्या खोलीत ठेवण्यात आले. जेव्हा त्या 2 कैद्यांना खोलीत नेण्यासाठी टेबल ला बांधले जात होते तेव्हा ते खूप हालचाल करू लागले, तिथून पळायचा प्रयत्न करू लागले पण जसे त्यांना सांगितले की पुन्हा तुम्हाला त्या खोलीत ठेवण्यात येईल. हे ऐकताच ते कैदी शांत झाले. हे बघून त्या 3 शास्त्रज्ञांपैकी एक शास्त्रज्ञ हा घाबरून गेला,त्याला या कैदींसोबत राहायचे नव्हते म्हणून त्याने सोव्हिएत युनियन च्या कमांडर ला गोळी  मारून हत्या केली.

                    या घटनेनंतर त्या शास्त्रज्ञाने त्या दोन पैकी एका कैदी ला विचारले की कोण आहेस तू ? त्या कैदीने खूप विचित्र उत्तर दिले की मी तुझ्याच अंदरची सावली आहे, त्या सावली ला तुम्ही कधीच बाहेर येऊ नाही देत. मी तुमच्यामधील वाईटपणा आहे. हे एकूण शास्त्रज्ञ घाबरला आणि त्याच घाई गडबडीत त्याने त्याच्यासोबतचे दोन शास्त्रज्ञ आणि त्या दोन कैदींची गोळी मारून हत्या केली आणि स्वतः आत्महत्या करून टाकली. या सोबत हा प्रयोग इथंच संपला आणि अस म्हणतात या घटनेनंतर असा प्रयोग पुन्हा कोणत्याच व्यक्ती वर नाही केला गेला.

                पण 2009 मध्ये Creepypasta Wiki नावाच्या वेबसाईट वर एका अनोळखी अकाउंट द्वारे या प्रयोगाला जगासमोर आणण्यात आले आणि असा दावा केला गेला की हा असा प्रयोग होता जो मुद्दामून जगापासून लपविण्यात आला. मित्रानो ही झाली प्रयोगाबद्दल माहिती.

                आता आपण बघूया या प्रयोगात किती सत्य आहे. जेव्हा या प्रयोगाबद्दल रशियन गव्हर्नमेंट ला विचारण्यात आले तेव्हा त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाद्वारे बघितले तर या गोष्टींमध्ये अस सांगितले आहे की त्या कैद्यांच्या operation च्या वेळेस त्यांच्या हृदयात हवा गेल्यानंतर सुद्धा ते खूप वेळ जीवंत होते, पण असं होऊच शकत नाही, जर मानवाच्या हृदयात थोडी पण हवा गेली तर त्याच वेळी त्याचा मृत्यू हा हृदय विकाराच्या झटक्याने होईल. जर त्या 2 कैदींच्या हृदयात हवा होतील तर ते इतके दिवस कस काय जीवंत राहिले? आणि आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा stimulate ड्रग हा अश्या प्रकारचा प्रभाब पडताना नाही मिळाला आहे की मानवाला  वेदना झाल्यावर त्याला मजा येईल. इथंच हा प्रयोग नापास होतो ? ही घटना कोणीतरी लिहिलेली आहे ही घटना सत्य नाही.
                    
                    तुम्हाला माहिती आवडली  असल्यास माहिती शेअर कर, तुम्हला आश्चर्यचकित करणारे फॅक्टस माहिती करायचे असतील तर आमच्या इंस्टाग्राम पेज ला आताच फॉलो करा. धन्यवाद!