Why so many epidemics originate in China | China's Wild  Life Wet Markets Reality |China's Wet Markets are responsible for  most of diseases | Digital Infopedia

            जगातील अर्ध्याहून जास्त आजारांचे जन्म चीन मधूनच का होतात ? या बद्दल Digital Infopedia आज तुम्हाला सांगणार आहे. चीन ने आज पर्यंत जगाला Asian Flu, Bird Flu, Justinian Plague, Black Dead, Spanish  Flu, SARS, HIV AIDS आणि COVID-19 या सारख्या महामारी भेट म्हणून दिल्या आहे.आज आम्ही तुम्हाला याच प्रश्नाचे उत्तर देणार आहोत की का चीन मधूनच जीवघेण्या आजारांचे जन्म होतात ? चला बघूया.

Epidemic originated in China
Why so many epidemics originate in China

                 तुम्हाला NEWS मुळे इतके तर माहिती झाले असेल सध्या COVID-19 पूर्ण जगात खूप जोरात पसरतोय आणि COVID-19 हा व्हायरस वटवाघूळ (Bat) पासून तयार झाला आहे. तुम्हाला माहित नसेल की जास्तकरून जीवघेणे व्हायरस हे प्राण्यांपासून च जन्म घेतात जसे की COVID-19, प्लेग, स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू इत्यादी. हे सर्व जीवघेणे व्हायरस कोणत्या न कोणत्या प्राण्यामध्ये असतात आणि जेव्हा हे प्राणी माणसांद्वारे खाल्ले जातात किंवा कोणत्याही प्रकारच्या परिस्थिती मध्ये माणूस या प्राण्यांच्या जवळ येतो तेव्हा या व्हायरस ची लागण ही माणसाला होते.

            तुम्हाला माहिती आहे का बर्ड फ्लू व्हायरस ने पक्ष्यांपासून जन्म घेतला आहे, स्वाइन फ्लू ने डुक्करांपासून जन्म घेतला, HIV AIDS व्हायरस ने चिंपांझी पासून जन्म घेतला आणि COVID-19 व्हायरस हा एका Bat (वटवाघूळ) पासून निघून त्याने एका पॅन्गोलिन ला infect केले आणि त्या नंतर त्या पॅन्गोलिन पासून हा व्हायरस माणसांमध्ये पसरला. तुम्हाला एकूण धक्का बसेल चीन मध्ये पॅन्गोलिन एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे तेथील लोक पॅन्गोलिन ला आवडीने खातात.

         आता असं म्हटलं जातं की COVID-19 व्हायरस सर्वात आधी वटवाघूळ पासून पॅन्गोलिन मध्ये पसरला आणि पॅन्गोलिन पासून माणसांमध्ये पसरला पण यांचा एकमेकांना संसर्ग होण्यासाठी या तिघांना म्हणजे वटवाघूळ, पॅन्गोलिन आणि मानव हे एकाच ठिकाणी काही वेळ एकत्र येणे गरजेचे आहे. तुम्हाला एकूण धक्का बसेल वटवाघूळ, पॅन्गोलिन आणि मानव हे चीन मधील वुहान शहरातील Sea Food Market मध्ये एकत्र असतात. चीन मधील वुहान शहरातील Sea Food Market मध्ये जगातील 70% प्राणी हे विकले जातात.
  • Why so  many Epidemics originate in China ?
            University of Houston च्या एका प्राध्यापकानुसार या Sea Food Market मध्ये जास्तकरून प्राणी हे पिंजऱ्यात एकावर एक ठेवले जातात, यामुळे एका प्राण्याचे बॉडी फ्लूएड जसे की लघवी, रक्त इत्यादी हे दुसऱ्या प्राण्यावर पडते त्यामुळे जर एखाद्या प्राण्याला कोणता संसर्ग असेल तर त्या आजाराचा संसर्ग हा दुसऱ्या प्राण्याला सहजपणे होतो आणि जर त्या प्राण्याला कोणतीही व्यक्ती खाणार किंवा स्पर्श करेल तर त्या संसर्गाची लागवन ही त्या व्यक्ती ला सुद्धा होणार. आता तुमच्यामधील काहींना प्रश्न पडला असेल की बाकीच्या देशांमध्ये सुद्धा असे market असतात तर त्यांच्यापासून असे आजार का नाही होत ? फक्त चीन मधून च का होतात ?

Wild Life Wet Markets in China
Wet Markets in China

           मित्रानो याचे कारण असे आहे की बाकीच्या देशांमध्ये असलेले Wet Market आणि चीन मधील Wet Market यांच्या मध्ये खूप फरक आहे.जसे की बाकीच्या देशांमधील Wet Market मध्ये फक्त घरगुती (पाळीव) प्राणी विकले जातात पण चीन मधील Wet Market मध्ये पाळीव प्राण्यासोबत जंगली प्राणी आणि किडे सुद्धा विकले जातात. आता या जंगली प्राण्यांमध्ये असे खूप व्हायरस असू शकतात ज्यांची तपासणी अजून पण केली गेली नसेल. या जंगली प्राण्यांमध्ये असे पण प्राणी तुम्हाला बघायला मिळतील ज्यांना बाकी देशांमध्ये विकणे किंवा शिकार करणे बेकायदेशीर आहे पण चीन मध्ये असे नाही.

            चीन मधील Wet Market मध्ये विकले जाणारे अर्ध्याहून जास्त प्राणी हे कायदेशीर स्वीकारलेले आहे. तुम्हाला कधी हा प्रश्न पडलाय का, की का चीन मध्ये खाण्यासाठी प्राणी आणि किडे वापरले जातात ? त्यांना खायला भाजीपाला मिळत नाही का ? या प्रश्नाचे उत्तर हे चीन च्या इतिहासात आहे. चला चीन चा थोडाफार इतिहास बघूया.
  • History of China
            1959 पासून 1961 पर्यंत चीन मध्ये The Great Chinese Famine सुरू होता. या कालावधी मध्ये चीन च्या अर्थ व्यवस्थेला खूप मोठा झटका बसला होता, चीन या झटक्यामुळे खूप वर्ष मागे जाणार होता ? या दुष्काळात चीन मधील 360 लाखांपेक्षा जास्त लोक हे मृत्युमुखी पडले आणि चीन हा पूर्ण पणे नष्ट होण्याच्या मार्गावर होता. त्यावेळेस चीन चा अन्न पुरवठा बघणारा कम्युनिस्ट पक्ष देशातील लाखो लोकांना भूकमारी पासून वाचवण्यासाठी असमर्थ होता यामुळे 1978 पर्यंत चीन ची आर्थिक स्थिती इतकी खालावली होती की चीन च्या सरकारने पराभव स्वीकारून Priavate Farming ला अनुमती दिली. 
Private Farming in china
Private Farming in china

  • What is Private Farming in China
           Private Farming म्हणजे ज्यात शेतकरी प्राण्यांना एका ठराविक लेव्हल पर्यंत त्यांना एकत्र करून त्यांचे मांस, दूध, अंडी आणि त्यांच्यापासून बनणारी प्रत्येक वस्तू विकू शकतात आणि पैसे कमवू शकतात. चीन सरकारच्या या निर्णयामुळे तेथील सर्व व्यापारी, शेतकरी आणि मोठे मोठे उद्योजक हे high demand food जसे की कोंबड्या, डुक्कर हे वाढवू लागले त्यांना तयार करू लागले पण यामुळे लहान शेकऱ्यांना फायदा होत नव्हता म्हणून चीन सरकारने Wild Farming ला परवानगी दिली.
  • What is Wild Farming ( Wild Life Farming )
           Wild Farming म्हणजे जंगली प्राण्यांना पकडून त्यांना जीवित किंवा त्या प्राण्यांना कापून त्यांना विकणे. या Wild Farming ची सुरवात ही खूप सामान्य झाली जसे की, घरातील साप किंवा मुंगूस, नाले आणि गटारीमधील कासव, आणि घराच्या जवळील वटवाघूळ यांना पकडून शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळायचे आणि या प्राण्यांना पकडणे काही जास्त कठीण काम नव्हते.चीन सरकारने Wild Farming ला कधीच बंदी नाही घातली कारण त्यांच्या नागरिकांची दरिद्री ही कमी होत होती त्यांचे नागरिक त्यांच्या परिवाराचे पोट हे Wild Farming पासून च भरत होते आणि चीन च्या अर्थव्यवस्थेला Wild Farming ने परत चांगल्या परिस्थिती मध्ये आणले होते.

            चीन सरकार ला झालेल्या फायद्यामुळे चीन सरकार इतकी स्वार्थी झाली की त्यांनी पर्यावरण आणि Wild Life यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि 1988 मध्ये एक कायदा काढला त्यात त्यांनी अस म्हटलंय की चीन मधील प्रत्येक प्राणी हा चीन च्या मालकीचा आहे आणि चीन मध्ये Wild Farming आणि Trade ला सरकार सुरक्षा देईल आणि पाठिंबा दिला जाणार आणि त्यासोबत Wild life farming करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार स्वतः सुरक्षा प्रदान करेल.

            या सर्व गोष्टींमुळे चिनी शेतकऱ्यांना पूर्ण स्वातंत्र्य मिळाले होते आता ते वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पकडून विकू लागले. यासर्वांना बघून बाकी शेतकरी सुद्धा या Wild Life Farming मध्ये आले. चिनी शेतकरी आता फक्त साप, वटवाघूळ, कोंबड्या, जंगली डुक्कर आणि कासव च विकत नव्हते आता ते मोर,  अस्वल, उंदीर, मगर यासारखे अनेक प्राणी ते विकू लागले.
  • SARS Virus 
        आता जितके जास्त वेगवेगळ्या प्रजातीचे प्राणी तितके जास्त वेगवेगळ्या प्रकारचे आजार. जेव्हा 2002 मध्ये Severe Acute Respiratory Syndrome (SARS) हा आजार चीन मध्ये पसरू लागला तेव्हा या आजाराने 17 पेक्षा जास्त देशांना infect केले तेव्हा 800 च्या वर लोकांचे मृत्यु झाले. जेव्हा 2003 मध्ये वैज्ञानिकांनी SARS वर संशोधन केले तर तेव्हा त्यांना कळले की हा व्हायरस सर्वात आधी चीन मधील फोशन शहरातील Wet Market मधील Civet Cat नावाच्या प्राण्यांपासून जन्मला आहे. या बातमीनंतर चीन ने सर्व Wet Market बंद करून टाकले आणि Wild Life Farming बॅन करून दिली पण फक्त काही वेळेसाठी.

            या घटनेनंतर चीन ने 54 प्राण्यांवरील बॅन हा काढून टाकला आणि तुम्हाला विश्वास नाही होणार या 54 प्राण्यांमध्ये Civet Cat सुद्धा होती. यानंतर 2004 पर्यंत प्राण्यांच्या या बाजाराची किंमत 100 बिलिअन चायनीज युआन झाली होती. या बाजाराच्या इतक्या मोठ्या किंमतीमुळे चीन सरकार हा बाजार सुरू ठेवते आणि 2016 मध्ये चीन सरकारने Wild Life Farming मध्ये वाघ आणि सिंह यांच्या सारख्या अनेक प्राण्यांचा समावेश केला.
Private and wild life farming in china
Wet markets in China

            Peter Li (Professor in University of Houston) नुसार चीन मधील अर्ध्याहून जास्त लोक तर हे सर्व खात सुद्धा नाही कारण हे सर्व खूप महाग असतं. चीन मधील अमीर लोक च फक्त हे एक अधिमूल्य देऊन खातात. यामुळे Wet Markets हे महाग तर खूप जास्त आहे पण खूप छोटे आहेत. यावरून आपल्या अस समजतं की चीन सरकार ने अमीर लोकांच्या पैश्याना निवडलं त्यांच्या गरीब लोकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून आणि 2019 मध्ये चीन मधील एका Wet Market मधून Coronavirus ची उत्पत्ती झाली आणि चीन ने परत एक वेळा या wet markets आणि Wild Life Farming वर अनिश्चित काळासाठी बॅन लागू केला.
            जगातील सर्व संघटन हे चीन ला विनंती करत आहे की यासर्व गोष्टींवर कायमस्वरूपी निर्बंध लागू करा. आताच्या ताज्या रिपोर्ट नुसार चीन ने या सर्व गोष्टींवर कायमस्वरूपी निर्बंध तर लागू केले आहे. पण मित्रांनो चीन वर आपण किती विश्वास ठेवू शकतो. चीन भविष्यात पुन्हा या सर्व गोष्टी सुरू करू शकतो.जो पर्यंत चीन ला या Markets पासून पैसे मिळत राहतील तो पर्यंत हे सर्व Markets असेच सुरू राहतील आणि अश्या नवीन नवीन महामारी भविष्यात येतच राहतील.

            मित्रांनो माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये कळवा आणि तुम्हाला जगबद्दल आश्चर्यकरणारे तथ्य माहिती करायचे असतील तर आताच आमच्या इन्स्टाग्राम पेज ला फॉलो करा. धन्यवाद!