Is Ramayana considered a mythology or a history? | Ramayana is our history or mythology scientific proofs | Digital Infopedia 

        नमस्कार मित्रांनो, Digital Infopedia चा लेख हा रामायणाच्या वास्तविकतेवर आधारित आहे. आपल्याला असे खूप लोक भेटतात जे म्हणतात रामायण हे एक धार्मिक कथा आहे आणि असे पण काही लोक भेटतात जे म्हणतात की रामायण हा आपला इतिहास आहे. पण या दोघांचे ही दृष्टिकोन हे वेगवेगळे आहेत.आज आपण वैज्ञानिक दृष्टिकोन बघूया. रामायणातील काही घटना विज्ञानाद्वारे सत्य आहे की असत्य बघूया.

Is Ramayana a Myth or History
Ramayana is our history not mythology

        तुम्हाला हे माहीत आहे का?  तामिळनाडू आणि श्रीलंका यांच्यातील राम सेतू, ज्याला विदेशी लोक अडॉम्स ब्रिज म्हणून ओळखतात, अमेरिकेच्या पुरातत्व संशोधन टीमने शोधून काढले आहे की रामसेतू हा प्रत्यक्षात मानवनिर्मित पूल आहे जो कित्येक हजार वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. त्यामुळे याचा अर्थ असा होऊ शकतो की रामायण एका वास्तविक घटनेवर आधारित आहे ? कुठेतरी भारतीय आणि पाश्चात्य लोकांच्या मते, रामायण ही फक्त एक धार्मिक कथा आहे.  जे महा ऋषी वाल्मिकी यांनी 400 ते 100 BCE दरम्यान लिहिले होते. आता मित्रानो तुम्हालाही वाटते का की रामायण ही फक्त एक धार्मिक कथा आहे? हे सत्य जाणून घेण्यासाठी आपल्याला विज्ञानाची मदत घ्यावी लागेल आणि यावर विज्ञान काय म्हणते ते पहावे लागेल. विज्ञानाकडे रामायण वास्तविक असल्याचे सिद्ध करण्याचा काही मार्ग आहे का? आणि त्याचे उत्तर ऐकून तुम्हाला धक्का बसेल, या प्रश्नाचे उत्तर होय असे आहे.

            आपल्याला हे माहित आहे की रामायण ही एक कविता किंवा कथा आहे ज्यात सुमारे 480000 शब्द आहेत. रामायण हे  मूलतः महर्षि वाल्मिकी यांनी सुमारे 400 ते 100 BCE मध्ये लिहिले होते. रामायण आणि महाभारत या दोन्ही ग्रंथांमध्ये वेदांचा उल्लेख हा खुप वेळा आपल्याला झालेला दिसुन येतो, त्यामुळे हे सिद्ध होत की या दोन्ही कथा वेदांनंतर लिहिल्या गेल्या. म्हणजे, 1200 ते 400 BCE नंतर आणि आपण हे देखील पाहतो की महाभारताच्या शेवटच्या काही अध्यायांमध्ये रामायणाचा उल्लेख आहे.  याचा अर्थ असा आहे की रामायण महाभारतापूर्वी लिहिले गेले होते.  म्हणजेच, 100 BCE ते 400 AD च्या टाइमलाइनच्या आधी आणि जर आपण त्यात संस्कृत भाषेचा उत्क्रांतीचा डेटा देखील जोडला तर आपल्याला  कळते की रामायणात वापरलेली संस्कृत 400 BCE नंतर अधिक सामान्य होती, परंतु त्या वेळी तेथे कोणतेही प्रिंटिंग प्रेस नव्हते, मग रामायण महाभारताच्या इतक्या प्रती कशा बनवल्या?

            या प्रश्नाचे उत्तर आहे, वेगवेगळ्या गुरूंनी रामायणाच्या वेगवेगळ्या आवृत्ती बनवल्या जेणेकरून भगवान रामाची कथा सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहोचेल आणि ते त्यातून काही महत्त्वाचे जीवनाचे धडे शिकतील.  उदाहरणार्थ 

१.एकता ही ताकद

लक्ष्मण श्री राम यांचा सावत्र भाऊ होता, पण तरीही दोघांमध्ये खूप प्रेम होते त्यामुळे त्यांनी एकत्र वनवासही सहन केला.

२.समानता

भगवान राम वानर सेना घेऊन लंकेकडे निघाले होते. यावरून हे सिद्ध होत की श्री राम कोणत्याही प्राण्याला स्वतःपेक्षा कमी मानत नव्हते आणि हेच कारण होते की प्रत्येकजण श्री राम यांच्यासाठी आपला जीव देण्यास तयार होता जसे की गरुड जटायू.

३.अहंकार मानवाला नष्ट करतो. 

रावणाची गणना रामायणातील त्या पात्रांमध्ये केली गेली जी बुद्धिमत्तेच्या बाबतीत खूप पुढे होती पण तरीही तो हरला. तो कमकुवत होता म्हणून नाही, परंतु त्याच्या अहंकाराने त्याची बुद्धी रोखली होती, ज्यामुळे त्याला आपला जीव गमावावा लागला होता आणि त्याला त्याच्या अनेक प्रियजनांचे जीव गमवावे लागले होते.
आता आपण काही वैज्ञानिक पुरावे बघूया ज्यांनी आपण एका निष्कर्षावर येऊ शकणार.

  • पुरावा क्रमांक 1
  • Birth Date of Shri Ram
  • भगवान रामाच्या जन्माची तारीख 

Is Ramayana a myth or history
Birth Date of Shir Ram

            भगवान रामाच्या जन्माची तारीख आहे 10 जानेवारी 5114 BC. श्री रामाचा जन्म चैत्र महिन्याच्या नवव्या दिवशी दुपारच्या वेळी झाला होता आणि या वेळी वेगवेगळे ग्रह, तारे आणि संयोगांची स्थिती कशी होती ?  याचा उल्लेख हा महर्षी वाल्मिकीने रामायणाच्या पहिल्या पर्वाच्या 18 व्या अध्यायात केला आहे. जेव्हा Institute of Scientific Research on Vedas या संस्थेने अमेरिकेतून खरेदी केलेल्या प्लॅनेटेरियम सॉफ्टवेअरमध्ये अस्ट्रोनॉमिकेल संदर्भ पाहिले, तेव्हा त्यांना कळले की ग्रह आणि ताऱ्यांची अशी स्थिती 10 जानेवारी 5114 रोजी दुपारी घडली होती आणि तुम्हाला माहित आहे का?  जेव्हा ही तारीख चंद्राच्या कॅलेंडरमध्ये (Lunar Calendar) म्हणजेच आपल्या भारतीय दिनदर्शिकेत रूपांतरित करून पाहिली गेली, तेव्हा कळले की (Lunar Calendar) चंद्र कॅलेंडरनुसार, ही तारीख चैत्र महिन्यात शुक्ल पक्षाच्या 9 व्या दिवशी येते, ती सुद्धा दुपारी 12:00 ते दुपारी 1:00. दरम्यान, ही तीच वेळ आहे जेव्हा दरवर्षी राम नवमी साजरी केली. श्री रामाच्या इतर सावत्र भावांच्या म्हणजेच लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या जन्मावरही अशाच प्रकारचे अस्ट्रोनॉमिकेल संदर्भ दिले गेले आहेत, ज्यांना जर आपण प्लॅनेटोरियम सॉफ्टवेअर मध्ये टाकले तर त्यांची वेळरेखा श्री रामाच्या जन्माच्या काही वर्षानंतरच येते, मग काय? हे सर्व देखील फक्त एक योगायोग आहे का? हे जाणून घेण्यासाठी आणखी काही पुरावे शोधूया.

  • पुरावा क्रमांक 2
  • Lord Ram's age during exile
  • वनवास दरम्यान श्री राम चे वय 25 होते

Is Ramayana a myth or History
Shri Ram age during exile

            महर्षि वाल्मिकींनी रामायणातील अयोध्या कांडात लिहिले आहे की राजा दशरथला श्री रामाला लवकरात लवकर राजा बनवायचे होते कारण त्याचा स्वतःचा जीव धोक्यात होता.  राजा दशरथची राशी मीन होती आणि त्याचे नक्षत्र रेवती होते.  ज्याला सूर्य, मंगळ आणि राहूने वेढले होते.  त्यावेळेस असे मानले जात होते की जेव्हा हे  3 ग्रह एखाद्या राजाच्या नक्षत्राभोवती असतात, तेव्हा काही वर्षांत एकतर तो राजा मरू शकतो किंवा त्याच्याविरुद्ध षडयंत्र रचले जाऊ शकते.  हे टाळण्यासाठी दशरथाने श्री रामला राजा बनवण्याचा प्रस्ताव मांडला, जो राणी कैकेयीच्या सांगण्यावर नाकारण्यात आला आणि श्री रामला वनवासात पाठवण्यात आले.  आता या काळात, राजा दशरथाशी संबंधित काही अस्ट्रोनॉमिकेल संदर्भ दिले गेले आहेत, जेव्हा त्यांना प्लॅनेटोरियम सॉफ्टवेअरमध्ये टाकून बघितले, तेव्हा बाहेर आलेली तारीख होती 5 जानेवारी 5089 BC. आता जाणून घ्या या मधील रोचक गोष्ट म्हणजे 5089 BC बरोबर 5114 BC च्या 25 वर्षांनंतर येते आणि रामायणातील अनेक श्लोकांमध्ये असे वर्णन केले आहे की 14 वर्षांच्या वनवासानंतर जेव्हा श्री राम अयोध्येतून बाहेर आले, तेव्हा त्यांचे वय सुमारे 25 वर्षे होते.

  • पुरावा क्रमांक 3
  • Adam's Bridge
  • राम सेतू

Is Ramayana a myth or history
Adam's Bridge
                राम सेतू आजपासून 7000 वर्षांपूर्वी बांधला गेला.  म्हणजेच 5000 BC च्या आसपास.  सायन्स चॅनेल आणि पुरातत्वशास्त्रज्ञ चेल्सी रोज यांनी प्रकाशित केलेल्या एका व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला आहे की, जेव्हा त्यांनी तामिळनाडू आणि श्रीलंका दरम्यान असलेल्या राम सेतूची कार्बन डेटिंग केली, तेव्हा त्यांना समजले की या पुलातील वाळू 4000 वर्षे जुनी आहे आणि समुद्राच्या लाटांमुळे या पुलापर्यंत पोहचली आहे. पण त्या वाळू खाली असलेले काही मोठे दगड 7000 वर्षे जुने आहेत. आता कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय हे कसे शक्य आहे, कारण निसर्गात नेहमी नवीन गोष्टी जुन्या गोष्टींच्या वर थर बनवतात.  7000 वर्षांपेक्षा जुने दगड म्हणजे ख्रिस्ताच्या 2000 वर्षांनंतर + ख्रिस्ताच्या 5000 वर्षांपूर्वी आता तुम्ही सांगा त्या वेळी काय झाले,याचे उत्तर आहे  रामायण.

  • Is Ramayana a myth or history 

             आता गोष्ट अशी आहे की, हे तीनही पुरावे 5000 BC च्या दिशेने निर्देशित करतात.  पण वाल्मिकी रामायणानुसार रामायण त्रेतायुगात घडले.  म्हणजे आजपासून सुमारे 1.29 मिलीलीयन वर्षांपूर्वी.  आता यात आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की जेव्हा शास्त्रज्ञाने रामायणातील उपलब्ध अस्ट्रोनॉमिकेल संदर्भांचा शोध 5000 BC च्या अगोदर च्या वेळेत  घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना कळले की हेच अस्ट्रोनॉमिकेल संदर्भ दहा लाख वर्षांपूर्वी देखील पाहिले गेले होते. त्या काळात घडणाऱ्या Cosmic body च्या अस्ट्रोनॉमिकेल घटना आपल्यासाठी एक संदर्भ पॉईंट बनत आहे. या घटना 5000 BC च्या आधीही घडल्या होत्या आणि त्यापूर्वी ते 10 लाख वर्षांपूर्वी सुद्धा घडल्या होत्या, म्हणजे हा खगोलशास्त्रीय संदर्भ दर दहा लाख - 5 वर्षांत एकदा होतो. जसे पृथ्वी प्रत्येक ३६५ दिवसात सूर्याभोवती फिरते.

        हे सर्व इथेच संपत नाही कारण रामायणानुसार रावणाच्या महालाच्या प्रवेशद्वारावर चार दात असलेल्या हत्तींनी पहारा दिला होता. आता विज्ञानानुसार तो काल्पनिक प्राणी नव्हता. असे प्राणी लाखो वर्षांपूर्वी अस्तित्वात होते, ज्याला आज आपले शास्त्रज्ञ गोम्फोथेरस म्हणून ओळखतात, ज्यांचे अवशेष जगभरातील अनेक संग्रहालयांमध्ये आहेत आणि शेवटची गोष्ट जी 5000 BC च्या दाव्याच्या विरूद्ध आहे. द्वारका जे श्री कृष्णाचे शहर होते.  या पाण्यात बुडालेल्या शहरातील काही अवशेषांची तपासणी केल्यानंतर असे आढळून आले की हे शहर सुमारे 9500 वर्षे जुने आहे.  म्हणजेच त्याची निर्मिती सुमारे 7000 BC मध्ये झाली होती, पण कृष्णाचा जन्म द्वापर युगात झाला जो त्रेता युगानंतर येतो, मग श्री रामाचा जन्म 5000 BC मध्ये कसा होऊ शकतो. या आणि त्या आधी नमूद केलेल्या सर्व गोष्टी या गोष्टीकडे निर्देश करतात की रामायण 5000 BC नव्हे तर 1 दशलक्ष वर्षांपूर्वी घडले.

या सर्व गोष्टीच्या खात्रीसाठी, आपल्याला आणखी काही वर्षे थांबावे लागेल कारण त्यावर अजूनही संशोधन चालू आहे.  बघा माणूस काही जण या पुराव्यांवर विश्वास ठेवतील आणि काही मानणार नाहीत आणि वैज्ञानिक शोधाचे तर्कशास्त्र सांगतील. पण हे फक्त चुकीचे आहे असे सांगून चालत नाही.  पुराव्यांच्या आधारावर तर्काने प्रतिवाद देणे ही तुमची जबाबदारी आहे आणि आज आम्ही फक्त 1% रिऍलिटी तुमच्यासमोर सादर केली आहे.
रामायनाबद्दल अजून तर पूर्ण पुरावे विज्ञानाकडे नाही त्यामुळे आपण कोणत्याही एका गोष्टीवर ठाम राहू शकत नाही. आता इथं प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून वेगळे तर्क बघायला मिळतात. कोणी श्रद्धेच्या दृष्टीने बघत तर कोणी विज्ञानाच्या. वर दिलेले ३ पुरावे हे ५००० BC  कडे इशारा करतात पण वाल्मिकी रामायणानुसार रामायण हे त्रेता युगात घडले होते पण आपल्याकडे फक्त ५००० BC  पर्यंतचे पुरावे आहे त्यामुळे आपण कोणत्याही एका ठाम विषयावर येऊ शकत नाही. 

            माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला रोज नवीन नवीन फॅक्टस माहिती करायचे असतील तर आजच आमचं इंस्टाग्राम पेज अद्भुत तथ्य मराठी ला फॉलो करा. धन्यवाद...!!!