Why was Jawaharlal Nehru selected as the first Prime Minister of India instead of Sardar Vallabhbhai Patel ? | Digital Infopedia

        नमस्कार, Digital Infopedia आज तुम्हाला भारताच्या इतिहासातील काही काळ्या अध्यायाबद्दल सांगणार आहे.भारत स्वातंत्र्य होण्यासाठी खूप महापुरुषांनी बलिदान दिले आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर सुद्धा काही महापुरुषांचा इतिहास हा पुसला गेला आहे आणि काही महापुरुषांचे पद त्याच्याकडून हिसकावून घेण्यात आले आहे. आज तुम्हाला अश्याच एका अध्यायाबद्दल Digital Infopedia माहिती देणार आहे. चला सुरू करूया..

Sardar Patel vs Nehru
Why Sardar Patel did not become PM
   
  •  Why didn't Mahatma Gandhi allow Sardar Vallabhbhai Patel to become the Prime Minister of India?
  • महात्मा गांधींनी सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे पंतप्रधान का बनू नाही दिले.    
              लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची काँग्रेस पार्टी मध्ये मजबूत पकड होती. काँग्रेस पार्टी मध्ये पकड च्या बाबतीत सरदार पटेल यांना कोणीही हरवू शकत नव्हते. सरदार पटेल हे बॉम्बे प्रेसिडेन्सी मधून येत होते. सरदार पटेल यांना काँग्रेस पार्टी चे फ्रंट रेझर म्हणत होते. दुसऱ्या बाजूने पंडित नेहरू हे सर्वांत लोकप्रिय होते. आजच्या काळात देशात एक वर्ग असा पण आहे ज्यांचे म्हणणे आहे की सरदार पटेल जर देशाचे पहिले पंतप्रधान असते तर आज भारताची परिस्थिती वेगळीच असती.
 

            ही वेगळी गोष्ट आहे की जर सरदार वल्लभभाई पटेल भारताचे प्रधानमंत्री झाले असते तर सरदार पटेल हे फक्त स्वातंत्र्याचे फक्त 3 वर्ष त्यांच्या पदावर कार्यरत असते, कारण 1950 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचे निधन झाले. पण तुम्ही कधी विचार केलाय का ? सरदार पटेल यांच्याकडे PM बनण्यासारखी परिस्थिती होती का ? सरदार वल्लभभाई पटेल हे प्रधानमंत्री बनू शकत होते का ? या प्रश्नाचे सरळ उत्तर असे आहे की जेव्हा पर्यंत नेहरू काँग्रेस मध्ये होते तो पर्यंत सरदार पटेल हे प्रधानमंत्री  होऊ शकत नव्हते ? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला लवकरच कळेल, त्या आधी बघूया

  •  How did India get its first Prime Minister?
  • भारताला कसा मिळाला पहिला प्रधानमंत्री ?
            दुसऱ्या विश्वयुद्धानंतर ब्रिटिश साम्राज्य हे खूप कमकुवत झाले होते. 1946 मध्ये ब्रिटिश सरकारने कॅबिनेट मिशन प्लॅन तयार केला. या प्लॅन अंतर्गत काही ब्रिटिश अधिकाऱ्यांना एक जबाबदारी मिळाली होती की त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी भारतीय नेत्यांची मदत करावी. यातून अंतिम निर्णय असा घेण्यात आला की भारतात अंतरिम सरकार बनणार. अंतरिम सरकार म्हणून Viceroy Executive Council बनवायची होती. या council चा अध्यक्ष हा एक इंग्रज Viceroy होणार होता आणि काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष हे या Council चे Vise President होणार होते. पण तुम्हाला माहिती आहे का ? स्वातंत्र्यानंतर या Council च्या Vise President चे स्वतंत्र भारताचे प्रधानमंत्री बनणे हे जवळजवळ निश्चित होते. त्याकाळात काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मौलाना अब्दुल कलाम आझाद होते. काही मोठे नेते जेल मध्ये असल्याकारणाने मौलाना अब्दुल कलाम आझाद हे या पदावर 1940 पासून होते.

            मौलाना आझाद त्यावेळी ते पद सोडण्यासाठी तयार नव्हते, पण महात्मा गांधी यांच्या दबावामुळे मौलाना आझाद काँग्रेसचे अध्यक्ष पद सोडण्यासाठी तयार झाले आणि मग यानंतर काँग्रेसच्या नवीन अध्यक्षासाठी शोध सुरू झाला जो भारताचा पहिला प्रधानमंत्री बनणार होता ? हे निश्चित करण्यासाठी एप्रिल 1946 मध्ये काँग्रेस कार्यसमिती ची बैठक बोलवण्यात आली. या बैठकीत महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, आचार्य कृपलानी, राजेंद्रप्रसाद, खान अब्दुल गफार खान सहिद, आणि काही मोठे काँग्रेसी नेता या बैठकीत उपस्थित होते. महात्मा गांधी यांना पंडित नेहरू यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवायचे होते. नेहरू हे एक लोकप्रिय नेता होते, पण काँग्रेस च्या प्रांतीय समितीमध्ये नेहरूंचे समर्थन करणारे लोक हे कमी होते. 15 मधून 12 प्रांतीय समितीने सरदार पटेल यांचे समर्थन केले. जेव्हा बैठकीत पार्टीचे महासचिव आचार्य कृपलानी  यांनी म्हटले, ही परंपरा आहे, बापू, काँग्रेस अध्यक्षपदाची निवड प्रांतीय काँग्रेस समित्यांद्वारे केली जाते.  जवाहरलाल नेहरू यांचे नाव कोणत्याही काँग्रेस समितीने अध्यक्षपदासाठी प्रस्तावित केलेले नाही.  याचा स्पष्ट अर्थ असा होता की सरदार पटेल यांच्याकडे काँग्रेस अध्यक्षपदासाठी बहुमत होते, तर जवाहरलाल नेहरू यांचे नाव प्रस्तावित नव्हते.

  •  Nehru's name came under pressure from Mahatma Gandhi?
  • नेहरूंचे नाव महात्मा गांधींच्या दबावाखाली आले ?

Sardar Patel Vs Nehru
Nehru, Sardar Patel and Mahatma Gandhi

                महात्मा गांधींना जवाहरलाल नेहरूंना भारताचे पंतप्रधान म्हणून पाहायचे होते.  या महत्वाच्या बैठकीच्या काही दिवस आधी गांधींनी मौलाना यांना लिहिले होते, जर मला विचारले गेले तर मी जवाहरलाल नेहरूंना प्राधान्य देईन, माझ्याकडे याची अनेक कारणे आहेत.  महात्मा गांधींचा असा स्वभाव असूनही, जवाहरलाल नेहरू यांचे नाव एप्रिल 1946 मध्ये काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत चर्चेसाठी प्रस्तावित नव्हते.  शेवटी आचार्य कृपलानी यांना सांगावे लागले, बापूंच्या भावनांचा आदर करून मी जवाहरलाल नेहरूंच्या नावाने कांग्रेस अध्यक्ष होण्याचा प्रस्ताव मांडतो.  असे म्हणत आचार्य कृपलानी यांनी स्वतः नेहरूंचे नाव एका कागदावर मांडले. सरदार पटेल गांधींचा खूप आदर करायचे आणि ते त्यांचे बोलणेही टाळू नाही शकत होते.

  • Why did Gandhi promote Nehru?
  • गांधींनी  नेहरूंनाच का पुढे केले ?
                नेहरू त्या वेळी पक्षाच्या इतर सदस्यांपेक्षा आधुनिक विचारसरणीचे होते.  गांधींना वाटले की ते देशाला उदारमतवादी विचारांकडे नेतील.  महात्मा गांधींनी सरदार पटेल यांची निवड का केली नाही?  या प्रश्नाचे उत्तर स्वतः गांधींनी एका वर्षानंतर त्याकाळातील ज्येष्ठ पत्रकार दुर्गादास यांना दिले.  महात्मा गांधींनी त्यांना सांगितले की जवाहरलाल नेहरू काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून ब्रिटिश राजवटीपेक्षा चांगल्या पद्धतीने तडजोड आणि चर्चा करू शकले असते.  याशिवाय, महात्मा गांधींना वाटले की जवाहरलाल नेहरू सरदार पटेल यांच्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे आंतरराष्ट्रीय व्यवहारात भारताचे प्रतिनिधित्व करू शकतील.

  • Patel also considered Nehru a leader
  • पटेल यांनी सुद्धा नेहरू ला नेता मानले होते 

               या ऐतिहासिक घडामोडींचा विचार केल्यावर हे स्पष्टपणे समजू शकते की नेहरूंच्या काळात सरदार पटेल भारताचे पंतप्रधान होऊ शकले नसते.  पटेल यांची काँग्रेस संघटनेवर चांगली पकड होती, पण जननेते नेहरू होते.  सरदार पटेल यांनीही हा मुद्दा मान्य केला.  2 ऑक्टोबर 1950 रोजी इंदूरमध्ये महिला केंद्राच्या उद्घाटनासाठी गेलेले  पटेल आपल्या भाषणात म्हणाले की, महात्मा गांधी आमच्यामध्ये नाहीत.  म्हणूनच नेहरू हे आमचे नेते आहेत.  बापूंनी त्यांची उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती केली होती आणि त्याची घोषणाही केली होती.  आता त्यांच्या सूचनांचे पालन करणे हे बापूच्या सैनिकांचे कर्तव्य आहे आणि मी त्यांचा विश्वासघातकी सैनिक नाही.

          लेखक रामचंद्र गुहा त्यांचे पुस्तक इंडिया आफ्टर गांधी मध्ये लिहतात कि, गांधी त्यांच्या जिवंतपणी हिंदू आणि मुस्लिम यांच्या मध्ये सामंज्यस तयार नाही करू शकले, पण त्यांच्या मृत्यू ने जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यातील मतभेद दूर करण्यात मोठे योगदान  दिले . हि एका नव्या देशातील मोठ्या अस्थिर नेत्यांमधील तडजोड होती, ही  तडजोड त्यावेळी खूप महत्वाची होती . 

              तुम्हाला ही  माहिती कशी वाटली कमेंट करून कळवा . तुम्हाला जर रोज नवीन फॅक्टस माहिती करायचे असतील तर आमचे इंस्टाग्राम पेज " अद्भुत तथ्य मराठी " ला फॉलो करा. धन्यवाद !!!