Difference between boys and girls | Who is better in various activities | Science behind Girls vs Boys | Digital Infopedia
नमस्कार, Digital Infopedia आज तुम्हाला मुले आणि मुली यांच्यातील छोट्या छोट्या गोष्टींची तुलना करून वैज्ञानिक कारण सांगणार आहे की का मुली या मल्टी टास्किंग करण्यात एक्स्पर्ट असतात ? आणि का मुले ही फोकस करण्यात एक्स्पर्ट असतात ? मुले आणि मुली यांच्या मेंदू मध्ये काय फरक आहे ? आणि का मुली या अभ्यासात हुशार असतात आणि मुले ही शोध आणि व्यावसायिक क्षेत्रात हुशार असतात ? चला बघूया.
चेतावणी : ही माहिती सर्व वैद्यकीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अभ्यासातून तयार केली गेलेली आहे. या माहितीचा उद्देश हा मुले आणि मुलींमध्ये भेदभाव करणे असा नाही आहे. कृपया कोणीही या माहितीला कोणत्याही प्रकारच्या वादासोबत जोडू नये.
Girls vs Boys Scientific Comparison |
मुले आणि मुली यांच्यातील तुलना करण्यासाठी आम्ही काही पॉईंट तयार केले आहे.
- Boys or girls who are more talkative (कोण अधिक बोलणारे आहेत मुले किंवा मुली)
हा पॉईंट यासाठी यात समाविष्ट करण्यात आला आहे कारण, जेव्हा पण couple मध्ये भांडणं होतात तेव्हा सर्वात आधी ते जास्तीच्या बोलण्याने होतात. तुम्हाला माहिती आहे की आपल्या शरीराला आपला मेंदू हा control करतो. त्यामुळे आपल्या या प्रश्नाचे उत्तर पण आपला हाच मेंदू देणार आहे. वैज्ञानिकांनुसार आपले बोलणे हे आपल्या मेंदूचा समोरील भाग कंट्रोल करतो.
मेंदूचा हा समोरील भाग मुलांमध्ये मुलींच्या तुलनेत उशिरा मॅच्युअर होतो आणि मुलांच्या मेंदू मध्ये मुलींच्या तुलनेत 50% कमी रक्तप्रवाह असतो. हेच मोठं कारण आहे की ज्यामुळे मुली या जास्त बोलतात आणि मुले ही कमी बोलतात, कारण मुली या काही सेकंदात बोलण्यासाठी वाक्य तयार करतात तर मुले ही खूप वेळ लावतात.म्हणून तुम्हाला तुमच्या आसपास मुली या जास्त बोलताना दिसतात.
|
अस म्हणतात मुली या लवकर भावना व्यक करतात पण मुले ही खूप वेळ लावतात. याचे पण उत्तर वैज्ञानिकांनी दिलेले आहे. वैज्ञानिकांनी हे सिद्ध केले आहे की मुलांच्या मेंदू मधील Amygdala आणि Hippocampus मध्ये खुपचं कमी कनेक्शन असतात म्हणून मुले ही त्यांचा भावना बरोबर व्यक्त नाही करू शकत.
- Memory (स्मरणशक्ती)
खूप वेळा जेव्हा मुलगा आणि मुलगी मध्ये भांडण होते तेव्हा त्या भांडणात मुलगी ही एक किंवा अधिक वर्षांच्या आधी केलेली घटना सुद्धा घेऊन येते पण मुलाला ती घटना आठवत सुद्धा नाही. दुसरं उदाहरण म्हणजे मुलींना शाळेमध्ये शिकविलेला अभ्यास हा परीक्षा झाल्यानंतर सुद्धा आठवतो पण मुलांना परीक्षा झाल्यानंतर तो अभ्यास आठवत नाही. या प्रश्नाचे उत्तर सुध्दा आपल्याला आपल्या वैज्ञानिकांनी दिलेलं आहे.
|
- Read More: Unknown Dark Secrets of Indian Independence ?
- Read More: चीन मधूनच नवीन नवीन आजार का निघतात ?
- Multitasking (एकावेळी वेगवेगळी कामे करणे)
यामध्ये आपण बघू की मुले आणि मुलींमध्ये कोण एकावेळी वेगवेगळी कामे करू शकतात.तुम्हाला माहिती आहे की घरी मुली या एकाच वेळी वेगवेगळी कामे करतात. स्वयंपाक करताना बाकी कामे करण्यामध्ये मुली या एक्सपर्ट असतात. पण मुले जर एका वेळी दोन काम करायला गेली तर एक काम हे खराब होत. अस का होत ? याचे उत्तर पण आपल्याला वैज्ञानिकांनी दिले आहे.
वैज्ञानिकांनी 5 मुले आणि 5 मुलींना बोलविले आणि त्यांच्या प्रत्येकाच्या हातात एक एक मोबाईल दिला. त्या मुलांना आणि मुलींना वैज्ञानिकांनी सांगितलं की या मोबाईल मध्ये एक गेम आहे तो तुम्ही सर्व जणांनी खेळायचा आहे आणि त्यासोबत तुम्हाला एक वस्तू शोधायची आहे पण ती वस्तू तुम्हाला सहजासहजी नाही मिळणार. तुम्हाला प्रत्येक 1 मिनिटाला एक मेसेज येईल तो मेसेज तुम्हाला बघायचा आहे. त्या मेसेज मध्ये एक प्रश्न असेल तो प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे.त्यातून तुम्हाला एक छोटीशी हिंट मिळेल त्या हिंट नुसार तुम्हाला ती वस्तू शोधायची आहे.
वैज्ञानिकांनी गेम सुरू केला या गेम मध्ये मुले आणि मुलींना मोबाईल मध्ये गेम खेळत खेळत हा दुसरा गेम सुद्धा खेळायचा होता. गेम समाप्त झाला आणि गेम चा निकाल आला. हा गेम मुलींनी जिंकला आणि मुले हरले. हा गेम सुरू असतांना वैज्ञानिकांनी नोटीस केले की मुलांच्या मेंदू मध्ये मुलींच्या तुलनेत ग्रे मॅटर हा कमी असतो. मुलींमध्ये Nerve cell चे प्रमाण हे जास्त असते, त्यामुळे मुली या एकाच वेळी अनेक काम करू शकतात. मुली या एका कामातून लगेच दुसऱ्या कामात लक्ष देतात. वैज्ञानिकांनी आणखी एका गोष्टीचे निरीक्षण केले की मुलींचा उजवा आणि डावा मेंदू हा खूप जास्त प्रमाणात एकमेकांच्या जवळ जुळलेला असतो.
पण अस का आहे की मुलींच्या मेंदू मध्ये ग्रे मॅटर हे कमी असतं ? याचे उत्तर पण वैज्ञानिकांनी आपल्या इतिहासात जाऊन दिले. जर आपण मानवी इतिहास बघितला तर अश्मयुगामध्ये पुरुष हे शिकार करण्यासाठी जायचे आणि शिकार करतांना त्यांना फक्त एक प्राणी मारावा लागत असे आणि तो मारलेला प्राणी घरी घेऊन जावा लागत असे. पण जर आपण अश्मयुगीन स्त्रियांना बघितलं तर त्यांना घरातील सर्व कामे, मुलांना सांभाळणे, जेवणासाठी लागणारे जीवनसत्त्वे असलेल्या वस्तू शोधून स्वयंपाक करणे इत्यादी सर्व कामांमुळे अश्मयुगापासून मुलींच्या मेंदू ची वाढ ही सर्व कामे एका सोबत करण्यासाठी सज्ज झाला.
Stone age women taking care of family |
या प्रयोगात वैज्ञानिकांनी मुलांच्या मेंदू मध्ये पण एक निरीक्षण केले, मुले ही मुलींपेक्षा जास्त फोकस असतात. मुले जे पण काम करतात त्यामध्ये इतके गुंतून जातात की त्यांना आजू बाजूला काय होत आहे हे पण केव्हा केव्हा भान नसतं. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की अस काय आहे मुलांच्या मेंदू मध्ये की मुले इतकी फोकस असतात. वैज्ञानिकांनुसार मुलांचा उजवा आणि डावा मेंदू यांच्या मध्ये मुलींच्या मेंदू च्या तुलनेत जास्त अंतर असते. म्हणून मुले जेव्हा पण काही काम करतात तेव्हा त्या कामाचा डेटा हा मुलांच्या मेंदू च्या फक्त एका भागात फिरतो पण मुलींमध्ये तो डेटा मेंदू च्या दोघी भागात फिरतो त्यामुळे त्या एका वेळी जास्त काम करू शकतात आणि त्यांची स्मरणशक्ती ही खूप जास्त असते.
अश्मयुगामध्ये पुरुष हे शिकार करण्यासाठी जायचे त्यामुळे त्यांना फक्त त्यांच्या शिकार वर फोकस करावा लागायचा म्हणजेच एका वेळी फक्त एक काम आणि शिकार साठी शारीरिक शक्ती लागायची म्हणून पुरुष हे शारीरिक दृष्ट्या मुलींपेक्षा अधिक शक्तिशाली असतात. पुरुष शिकार करायचे म्हणून आता च्या काळात मुले ही मुलींपेक्षा जास्त फोकस असतात. मुले ही मुलींच्या तुलनेत एका वेळेला एक काम हे खूप चांगल्याप्रकारे करू शकतात.
Stone age Mens hunting |
या सर्व गोष्टीमुळे मुलांची प्रॅक्टिकल, लॉजिकल आणि रॅशनल विचारशक्ती ही मुलींच्या तुलनेत खूप जास्त असते म्हणून मुले ही नवीन नवीन शोध करण्यात मुलींच्या तुलनेत खूप पुढे असतात. यामुळे जर कोणत्या मुलीला वाईट वाटतं असले तर त्यांनी google करून बघा top 50 scientist. या वैज्ञानिकांपैकी कदाचितच काही मुली मिळतील पण बाकी सर्वात जास्त ही मुलेच आहेत.
- Read More: प्रेम म्हणजे नक्की काय ?
- Read More: तुमच्या वर जर कोणी खोटी FIR केली तर तुम्ही काय कराल ?
- Who is more aggressive boys or girls (कोण अधिक आक्रमक आहेत मुले किंवा मुली)
वैज्ञानिकांनुसार मुले ही मुलींच्या तुलनेत जास्त आक्रमक आणि रागीट असतात. कारण मुलांच्या मेंदू मधील Amygdala चा राग ,भीती आणि बोलणे कंट्रोल करण्याचा भाग हा मुलींच्या तुलनेत खूप मोठा असतो, आणि मुलांमध्ये रागात असतांना किंवा संकटात असताना मेंदू स्टेम हा ऍक्टिवेट होतो, आणि मुलींमध्ये मेंदू स्टेम हा फक्त तेव्हाच ऍक्टिव्ह होतो जेव्हा त्यांच्या जीवाला धोका असतो. पण मुलांमध्ये मेंदू स्टेम हा मुले रागात असताना, भीती वाटत असताना आणि जीवाला धोका असेल तेव्हा ऍक्टिव्ह होतो. म्हणून मुले ही मुलींपेक्षा जास्त आक्रमक असतात.
आता निसर्गाच्या नियमानुसार प्रत्येक प्राण्यांमध्ये पुरुष प्रजाती ही स्त्री प्रजातीला अट्रॅक्ट करण्यासाठी दुसऱ्या पुरुष प्रजाती ला हरविण्याचा प्रयत्न करते पण आता आपण सुद्धा माकडांपासून विकसित झालेले आहोत.त्यामुळे ही मानसिकता आपल्यामध्ये सुद्धा आहे.उदाहरण साठी छपरी प्रेमींना सोशल मीडिया वर बघून घ्या.
- तात्पर्य
- भाषा आणि बोलणे यामध्ये मुली या मुलांपेक्षा पुढे आहे.
- शारीरिक तंदुरुस्ती आणि सामर्थ्य यामध्ये मुले मुलींच्या पुढे आहे.
- मुली या भावना सांभाळण्यात कमकुवत असतात तर मुले ही भावना व्यक्त करण्यात कमकुवत असतात.
- मुली या नम्र असतात आणि मुले ही आक्रमक असतात.
- मुली एकाच वेळी जास्त काम करम्यासाठी एक्सपर्ट असतात आणि मुले ही फोकस आणि प्रॅक्टिकल आणि लॉजिकल विचारशक्ती मध्ये चांगले असतात.
तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट सेकशन द्वारे कळवा. माहिती आवडली असल्यास जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हला रोज नवीन नवीन इंटरेस्टिंग फॅक्टस माहिती करून घ्यायचे असतील तर आजच आमचे इंस्टाग्राम पेज "अद्भुत तथ्य मराठी" ला आजच फॉलो करा. धन्यवाद !
4 Comments
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeletenice information💯💯👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
ReplyDeleteThank you
Delete❤❤❤❤
ReplyDelete