What will happen if India & Pakistan go for Nuclear War | India vs Pakistan Nuclear War | India vs Pakistan |Digital Infopedia
नमस्कार मित्रांनो, तुम्हाला Digital Infopedia आज अश्या एका विषयावर माहिती सांगणार आहे की, तो विषय 100 मधून 60 भारतीयांची इच्छा आहे. तो विषय आहे कि, काय होईल जर भारत आणि पाकिस्तान मध्ये एक परमाणु युद्ध झालें तर ? या प्रश्नाचे उत्तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर Digital Infopedia चा हा लेख पूर्ण बघा. चला सुरू करूया..
![]() |
Nuclear War Between India Pakistan |
चेतावणी: ही सर्व माहिती सायंटिफिक रिसर्च आणि कॅल्क्युलेशन्स च्या आधारावर तयार केली गेली आहे. या माहितीचा उद्देश कोणतीही व्यक्ती, धर्म आणि देशाला ठेच पोहचविण्याचा नाही,त्यामुळे आपण सर्वानी ही माहिती स्वतः चे ज्ञान वाढवणीसाठी वापरावी. या माहिती ला कोणीही कोणत्याही वादाला जोडायचा प्रयत्न करू नये, वाद तयार झाल्यास Digital Infopedia जवाबदार राहणार नाही. धन्यवाद !
ऑगस्ट 2020 मध्ये, काश्मीरवरील वाढत्या तणावामुळे, पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद अहमद यांनी भारताला परमाणु युद्धाचे आव्हान दिले. आता आपल्या सर्वांना माहित आहे की भारत नो फर्स्ट स्ट्राइक धोरणाचे पालन करतो, म्हणजेच जोपर्यंत कोणी भारतावर प्रथम हल्ला करत नाही तोपर्यंत भारत कोणावरही प्रथम हल्ला करत नाही. पण मित्रांनो, जर एखाद्या दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्यात प्रत्यक्षात परमाणु युद्ध सुरू झाले तर ? तुम्हाला हे माहित आहे का? की संपूर्ण जग बर्फाने झाकले जाईल आणि पुन्हा एकदा हिमयुग सुरू होईल आणि याबद्दल मी तुमची थट्टा करत नाही आहे, तुम्ही हा संपूर्ण लेख वाचत राहा, तुम्हाला कळेल, भारत आणि पाकिस्तानचे परमाणु युद्ध कसे संपूर्ण जगाच्या विनाशाला कारणीभूत ठरेल.
आता मला माहीत आहे, तुम्हाला वाटेल की जर अणुबॉम्ब फुटला तर आग निघेल, मग हिमयुगाशी त्याचा काय संबंध, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या लेखात मिळेल. पण थोडा विचार करा, जर या युद्धादरम्यान एकच 300 किलोटन परमाणु बॉम्ब फुटला तर त्याचे किती परिणाम होऊ शकतात? फक्त एका बॉम्बचा विध्वंस पूर्ण 126 चौ.कि.मी. पर्यंत पोहोचेल, म्हणजे संपूर्ण जिल्हा एका प्रकारे नष्ट होईल. जिथे जिथे हा बॉम्ब फुटेल तिथे 75% लोकांच्या चिंध्या उडून जातील आणि त्यानंतर सर्वत्र फक्त अंधार दिसेल, हा अंधार द्वेष आणि विनाशाने केलेला हा विनाश असेल. द्वेषाची किंमत केवळ दोन्ही देशांनाच नव्हे तर जगातील संपूर्ण 90% लोकसंख्येला मोजावी लागेल, जे उपासमारीमुळे तडपू तडपू मरतील.
आता पहिला प्रश्न येतो की, पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद अहमद यांनी भारताला जी धमकी दिली, जे अकलेचे खंड असे समजत असतील की या युद्धादरम्यान नौदलाची जहाजे आणि हवाई दलाची जहाजे उडतील, बंदुका आणि टॅंक धावतील. त्यांना सांगू इच्छितो की यावेळी थेट परमाणु युद्ध होईल. पण मित्रांनो, युद्धात भारताला पराभूत करण्यासाठी पाकिस्तानकडे पुरेसे परमाणु हत्यारे आहेत का? पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की पाकिस्तानकडे एकूण 165 परमाणु हत्यारे आहेत. त्या तुलनेत भारताकडे फक्त 150 परमाणु हत्यारं आहेत. पण दोन्ही देश नवीन परमाणु हत्यारे बनवण्यात गुंतले आहेत आणि सूत्रांनुसार 2025 पर्यंत दोन्ही देशांकडे 400 ते 500 परमाणु हत्यारं असतील. आता 400 ते 500 सोडा, पण यातील एकही परमाणु बॉम्ब फुटला तर, मग एका झटक्यात मृतदेह जमा होतील आणि केवळ मृतदेहच नव्हे तर बॉम्बमधून निघणारा अग्नीचा गोळा इतका वेगाने पसरेल की तो 2 किमी पर्यंत पसरेल आणि त्याच्या मार्गात येणारे प्रत्येक मनुष्य , प्राणी, वाहन आणि इमारतींना एका झटक्यात चिरडून टाकेल. पण परमाणु बॉम्बमुळे झालेल्या विनाशाचा हा फक्त एक ट्रेलर आहे. पण जर दोन्ही देशांनी मिळून त्यांचे 200 बॉम्ब स्फोट केले तर आता ते दृश्य किती भयंकर असेल याची कल्पना करण्याचा प्रयत्न करा.
- What will be the impact of India-Pakistan nuclear war on the whole world?
- भारत पाकिस्तान परमाणु युद्धाचा संपूर्ण जगावर काय परिणाम होईल ?
या दोन देशांमधील युद्धामुळे केवळ आपणच नाही तर अनेक देश विनाशाच्या भीतीमध्ये आहेत. म्हणूनच कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठाने देखील यावर एक संशोधन केले आहे आणि या संशोधनानुसार, असे समजा की जर भारताने 100 परमाणु बॉम्ब स्फोट केले आणि पाकिस्तानने 150 परमाणु बॉम्ब स्फोट केले तर असा धोकादायक स्फोट होईल की 20 दशलक्ष लोक मृत्यूमुखी पावतील आणि बॉम्बमधून जी आग पसरेल ती आणखी 5 ते 13 कोटी लोकांना क्षणार्धात राख करेल आणि जर दोन्ही देशांनी यापेक्षा जास्त बॉम्ब फोडले तर ते निश्चित आहे मग मृतांची संख्या यापेक्षा दुप्पट होईल आणि असे मी नाही कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठातील एका संशोधनाने म्हटले आहे.
- What will happen to the people who survived the India-Pakistan nuclear war?
- भारत पाकिस्तान परमाणु युद्धानंतर जीवित राहिलेल्या लोकांचे काय होईल?
![]() |
Smoke of Nuclear War |
आपण असे गृहीत धरू की आपण जगाच्या त्या अर्ध्या लोकसंख्येचा भाग आहात जे या धोकादायक बॉम्बस्फोटामुळे मरण पावले नाहीत, तरीही आपण पर्यावरणातील होणाऱ्या बदलापासून वाचू शकणार नाही कारण भारत पाकिस्तान परमाणु युद्धामुळे असे काही बदल जगाच्या वातावरणात होतील, जे हिमयुगासारखी (Ice age) परिस्थिती निर्माण करतील. याचे कारण असे की जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये परमाणु बॉम्ब स्फोट होऊ लागतील, तेव्हा त्यातून संपूर्ण 1500 ते 3500 कोटी किलो धूर निघेल. जो फक्त 2 आठवड्यांत संपूर्ण पृथ्वीच्या वातावरणात कर्करोगासारखे पसरण्यास सुरुवात होईल आणि हा धूर हळूहळू संपूर्ण जगावर कब्जा करेल, परंतु हा धूर सामान्य आगीतून निघणाऱ्या धुरासारखा नसेल. हा धूर Black Carbon आणि Radioactive Particles पासून बनलेला असेल आणि हे दोन्ही हवेत उपस्थित सूर्यप्रकाशात मिसळून अधिक गरम होतील आणि गरम झाल्यामुळे हा धूर पृथ्वीच्या स्ट्रॅटोस्फीअर थरात अधिक वेगाने पसरायला लागेल आणि मग हा धूर पृथ्वीच्या स्ट्रॅटोस्फियर मध्ये फिरत राहील आणि हा धूर जमिनीवर पडणार नाही, त्यामुळे खाली पूर्ण हिमवर्षाव हवामान असेल कारण, धुराचा हा थर सूर्यप्रकाश पृथ्वीवर येण्यापासून रोखेल आणि त्यामुळे पृथ्वीच्या वातावरणात उष्णता प्रवेश करू शकणार नाही.
बॉम्ब स्फोटातून निघणारे सर्व गरम धूर वरील स्ट्रॅटोस्फीअरमध्ये स्थिरावतील आणि धूरच्या त्या जाड थरामुळे सूर्याची किरणे जमिनीवर पोहोचू शकणार नाहीत. ज्यामुळे जगभरातील सरासरी तापमान 2 ते 5 अंश सेल्सिअसने कमी होईल आणि पृथ्वीचा वायव्य भाग बर्फात गोठेल. पण हा धूर पृथ्वीच्या वरून कधीच जाणार नाही का? याचे उत्तर असे आहे की हा धूर पूर्णपणे साफ होण्यास सुमारे 10 वर्षे लागतील आणि तोपर्यंत हिमयुगासारख्या परिस्थितीत टिकून राहणे शक्य होणार नाही. आपल्या पूर्वजांचे उदाहरण घ्या जे गेल्या दोन हिमयुगांमध्ये जिवंत राहिले, परंतु त्या वेळी हिमयुग एकाच वेळी आले नाही, ते हळूहळू वातावरणात बदल होत गेले आणि त्या मुळे आपले पूर्वज देखील त्यानुसार विकसित होण्यास सक्षम झाले. परंतु जर हिमयुग अचानक आले, तर ही साधी बाब आहे की पृथ्वीवरील बहुतेक प्राणी चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकणार नाहीत आणि पृथ्वीच्या अन्नसाखळी आणि परिसंस्थेवर मोठ्या प्रमाणात आपत्ती येतील.
- What effect will nuclear war have on life on Earth?
- परमाणु युद्धाचे पृथ्वीवरील जीवनावर काय परिणाम होतील ?
आता आपण मानव तर काही पण जुगलबंदी करून 10 वर्षे काढून घेऊ पण तरीही आपण कधीही सामान्य जगू शकणार नाही कारण, जर आता परमानु बॉम्ब फुटला तर दक्षिण आशियाच्या वरील अर्ध्याहून जास्त ओझोनचा थर फुटेल आणि एक मोठा छिद्र तयार होईल आणि या कारणास्तव,जेव्हा स्ट्रॅटोस्फियरमधून धूर साफ होईल तेव्हा सूर्याची Ultraviolet Rays या ओझोन थराच्या छिद्रातून फिल्टर न होता जमिनीवर पडतील. त्यामुळे आपली त्वचा जळेल आणि वितळेल आणि त्याच वेळी आपल्याला त्वचेच्या कर्करोगासारखा आजार होण्याची शक्यताही वाढेल.
- Read More : भूत प्रेत खरंच अस्तित्वात आहे का ?
- Read More : स्पर्धा परीक्षा उपयुक्त बहुपर्यायी प्रश्न ?
- How will life on earth resume after nuclear war?
- परमाणु युद्धानंतर पृथ्वीवरील जीवन कसे पुन्हा सुरू होईल ?
आता धूर साफ झाल्यानंतर पाऊस पडायला सुरुवात होईल, परंतु जगभरात पर्जन्यवृष्टीची टक्केवारी 15% ते 30% पर्यंत कमी होईल. म्हणजेच, पाऊस पडण्याची शक्यता 30% पेक्षा कमी असेल आणि भारतामध्ये आणि पाकिस्तान मध्ये, समजा पाऊस पडण्याची शक्यता 0% असेल आणि पाऊस कुठे पण आणि किती पण पडला तो हवेत असलेल्या Radioactive Particles मध्ये मिसळेल आणि या पावसाचे रूपांतर ऍसिड रेन मध्ये होईल. या Acid Rain मध्ये असलेले Radioactive पार्टीकल्स हे इतके लहान आहेत की ते आपल्या फुफ्फुसात सहज प्रवेश करू शकतात आणि आपल्याला दमा, क्रॉनिक ब्राँकायटिस सारख्या आजारांना बळी बनवू शकतात. ही तर मानवांची गोष्ट झाली पण, जर हा ऍसिड पाऊस पृथ्वीवर पडला तर संपूर्ण जमीन संपूर्ण 70 वर्षे नापीक होईल कारण, ऍसिड पाऊस खनिजे आणि पोषक तत्त्वे नष्ट करतो जे झाडांना जमिनीत वाढण्यासाठी आवश्यक असतात.
- Read More : स्वातंत्र्य भारताचे काही काळे रहस्य ?
- Read More : इंदिरा गांधी ने १९७५ मध्ये का आपत्काल लागू केला ?
आता ज्या पृथ्वीवर सूर्याची किरणे जमिनीवर पोचणार नाहीत, किंवा पाऊस कुठेही पडत नसेल, तेव्हा काहीही उगण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही आणि यामुळे संपूर्ण परिसंस्था आणि अन्नसाखळी नष्ट होईल आणि हळूहळू अन्नाची कमतरता सुरू होईल. आणि सुमारे 200 कोटी लोक उपासमारीमुळे त्रस्त होऊन मरतील.
- How can India stop the arrival of nuclear weapons from Pakistan?
- भारत पाकिस्तान कडून येणारे परमाणु हत्यार कसे रोकू शकेल ?
![]() |
Nuclear Weapons in India |
अंदाजानुसार, जर भारत पाकिस्तान युद्धात सर्व परमाणु बॉम्ब युद्धात वापरले गेले, तर समजून घ्या की जगातील 90% लोक भूकमरी ने मरतील. म्हणजेच, दोघांपैकी कोणताही देश युद्ध जिंकला तर तो जिंकून सुद्धा हरलेला असेल. पण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कोणता देश युद्ध जिंकू शकेल ? याचे उत्तर असे आहे की जिंकणारा देश त्यांचा विजय अल्प कालावधीत साजरा करेल परंतु दीर्घकालीन नाही. परमाणु युद्धात फक्त त्या देशाला जगण्याची अधिक शक्यता असते, ज्याचयकडे परमाणु बॉम्ब रोखण्यासाठी शस्त्रे असतात आणि भारताकडे असे एक सुरक्षा कवच आहे पण पाकिस्तानकडे असे कोणतेही सुरक्षा कवच नाही. मी इथं अँटी बॅलिस्टिक मिसाइल डिफेन्स सिस्टीम (Anti Ballistic Missile Defense System) बद्दल बोलत आहे ज्याला मिसाइल डिफेन्स सिस्टम (Missile Defense Sysyem) देखील म्हणतात. U.S.A., इस्रायल, रशिया नंतर भारत हा जगातील चौथा देश आहे ज्याच्याकडे Missile Defence System आहे. जे पाकिस्तानमधून येणारे अर्ध्याहून जास्त परमाणु बॉम्ब हवेत उडवून देईल आणि ही अभिमानाची गोष्ट आहे की मित्रांनो भारताकडे अशा 2 सिस्टीम आहेत, एक Prithvi Air Defense System (PAD) आणि दुसरी Advance Air Defense System (AAD) ज्यांची रेंज 2000 ते 5000 किमी पर्यंत आहे. या व्यतिरिक्त, भारताने रशिया कडून S4 Defense System देखील मागवली आहे आणि भारताकडे ब्रह्मोस आहे जे एक Super Sonic Missile आहे जे जमीन, हवा किंवा पाण्यावर कुठेही लाँच केले जाऊ शकते आणि जर आपण Bramhos च्या सामर्थ्याबद्दल बोललो तर असे कोणतेही पाकिस्तानी शहर नाही. जे शहर त्याच्या निशाण्यावर येऊ शकणार नाही.
- Read More : जगतातील अर्ध्यहून जास्त आजार हे चीन मधूनच का निघतात ?
- Read More : रशियन झोपेचा प्रयोग काय होता ?
- Which country will disappear from the world map in the Indo-Pakistani nuclear war?
- भारत पाकिस्तान परमाणु युद्धात कोणता देश जगाच्या नकाशावरुन गायब होईल ?
मित्रांनो, हे सर्वात संभाव्य आहे की जर भारत कधी पाकिस्तानशी युद्ध करायला गेला तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरून नाहीसा होईल, पण त्याचबरोबर युद्धानंतर भारताची स्थिती देखील खूप वाईट होणार आहे. पण मित्रांनो जसे मी सांगितले की, या जगातील बहुतेक देशांना माहित आहे की परमाणु बॉम्ब वापरणे मूर्खपणा आहे. जो पण देश जिंकेल तो जिंकेल पण संपूर्ण जग हरेल आणि या कारणास्तव यू.एन. ने परमाणु बॉम्बच्या वापरावरही बंदी घातली आहे. तुम्हाला माहिती आहेच, भारत नो फर्स्ट यूज धोरणाचे पालन करतो, ज्यामुळे भारत परमाणु बॉम्बने कधीही पहिला हल्ला करणार नाही.
मित्रानो युद्ध ही अशी एक गोष्ट आहे ज्याने फक्त आणि फक्त विनाश हा होत असतो, पण काही देश आज पण असे धोकादायक अस्त्रे टायर करत असतात जसे कि नॉर्थ कोरिया, आपण बघितले कि परमाणू बॉम्ब किती नुकसान करू शकतो तरी पण पॉवर च्या नशेत असलेले काही देश असले धोकादायक अस्त्रांचे रोज काही न काही टेस्टिंग करत असतात, माझ्यामते तरी सर्व देशांनी एकत्र येऊन परमाणू बॉम्ब बनविणे आणि टेस्टिंग करणे बेकायदेशीर घोषित केले पाहिजे
मित्रानो तुम्हला परमाणू बॉम्ब बद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये कळवा आणि तुम्हला जर रोज रोज नवीन फॅक्टस माहिती करायचे असतील तर आजच आमचं इंस्टाग्राम पेज "अदभूत तथ्य मराठी" ला फॉलो करा. धन्यवाद !
2 Comments
Thank you brother for such new information❣️
ReplyDeleteWELCOME BROTHER❣️
Delete