Which chemical was responsible for Bhopal gas Tragedy? | What is methyl Isocynate? | What is mean by M.I.C. | Digital Infopedia.

            आज च्या तंत्रज्ञांनाच्या काळात भारताने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केलेली आपल्याला दिसते पण जेव्हा  स्वातंत्र्य मिळून फार काळ झाला नव्हता आणि देशातील बरेच नागरिक हे फार शिकलेले नव्हते त्याकाळात लोक शिक्षणाला पाहिजे तितके महत्व देत नव्हते. भारताला स्वातंत्र्य मिळून ३७ वर्षे झाले असताना देशाच्या मध्यभागी असलेल्या मध्य प्रदेश मधील भोपाळ मध्ये अशी एक घटना घडली जिने भारतच नव्हे तर अमेरिका सुद्धा हादरला होता. हि घटना एका केमिकलमुळे घडली होती. या संपूर्ण घटनेवर Digital Infopedia एक case study घेऊन आले आहे आणि मी सुद्धा एक Msc Chemistry चा विद्यार्थी असल्याच्या नात्याने काही केमिकल हे मानवासाठी किती घातक  असू शकतात या बद्दल माहिती तुम्हला  सांगू इच्छितो. 

bhopal gas kand
which chemical led to the bhopal gas tragedy in 1984

Bhopal gas tragedy date

        भारताच्या इतिहासातील सर्वात भयंकर इंडस्ट्रियल संकट हे भोपाळमध्ये आलं होतं ज्याचे परिणाम आतापर्यंत भोपाळ वासियांना बघावे लागत आहेत. २-३ डिसेंबर १९८४ ची ती काळरात्र होती. Union Carbide India Limited ही १९६९ मध्ये भोपाळमध्ये उभारण्यात आलेली कीटक नाशक तयार करणारी कंपनी होती . या कंपनीमुळे तिथल्या लोकांना रोजगार मिळाला होता हे खरं, मात्र रोजगारापेक्षाही जास्त जीवितहानी या कंपनीमुळे झाली होती .

        देश स्वतंत्र होऊन फार काळ झाला नव्हता. शैक्षणिक दृष्ट्या ही लोक हवेत इतके प्रगत नव्हते . आणि अशा लोकांनी फक्त रोजगार या दृष्टीने विचार करून कंपनीमध्ये काम करायला सुरुवात केली होती . मात्र या कंपनीत कुठेली रसायन वापरले जात आहेत आणि त्यांचे परिणाम काय होतील याची कसलीच कल्पना या लोकांना नव्हती. युनियन कार्बाइड इंडिया एलटीडी कंपनी मोठी असली तरी कामगारांच्या सुरक्षिततेचा थोडाही विचार इथे अजिबात केला गेला नव्हता . कंपनीतल्या मशीनचा मेंटेनन्स व्यवस्थित आहे का? कंपनीमध्ये सेफ्टी इक्विपमेंट इंस्टॉल आहेत का? कामगार सुरक्षित आहेत की नाही ? याकडे कंपनीतील वरिष्ठांनी लक्ष देणं गरजेचं समजलं नव्हतं.  सरकारी कर्मचाऱ्यांना कंपनीच्या मालकाकडून पैसे मिळत असल्याने त्यांनीही या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे समजले नव्हतं. 

Bhopal gas tragedy occurred due to leakage of

           या कंपनीमध्ये Methyl Isocyanate नावाचं अतिशय भयानक रसायन तयार करून त्याचा वापर ही कंपनी करत होती. तब्बल ४१ टन केमिकल चा वापर करून इथे पेस्टिसाइड तयार केले जायचे. ही कंपनी एम आय सी (M.I.C.) म्हणजेच (Methyl Isocyanate) मिथेल आयसोसायनेटचा जवळपास ४२ टन स्टॉक मोठमोठ्या टँक मध्ये स्टोअर करून ठेवायची .याचे जर कधी लीकेज झाले तर परिणाम काय होतील? याची माहिती असून सुद्धा , फक्त प्रोडक्शन सुरळीत सुरू राहावं आणि त्याचा प्रॉफिट वेळोवेळी मिळावा , म्हणून इतकी मोठी रिस्क शहराचा विचार न करता घेतली गेली होती. मिथिल आयसोसायनेट हे केमिकल पाण्यासोबत अतिशय हिंसक रितीन रिऍक्ट होतं आणि ४२ टन  मिथेल आयसोसायनेट (Methyl Isocyanate) शहराच्या मध्यभागी एका टाईम बॉम्ब सारखं होता आणि हा टाईम बॉम्ब २-३ डिसेंबर १९८४  च्या मध्यरात्री भोपाळमध्ये फुटला.  या दिवशी रात्री बारा वाजेच्या सुमारास, या कंपनीच्या आजूबाजूच्या वस्ती मध्ये राहणाऱ्या लोकांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला,  आणि सर्व लोकांना खोकला सुरू झाला. थोड्याच वेळात लोकांच्या तोंडातून रक्त बाहेर येऊ लागले. 

            लोकांना काहीच कळत नव्हते त्यांना काय होतंय? प्रत्येक जण जिवाचा आकांत करून आपला जीव वाचवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पळू लागला होता.  केवळ दोनच तासांच्या आत एम आय सी (M.I.C. Methyl Isocyanate) गॅस हा आठ किलोमीटर पर्यंत पसरला होता.  लोकांना श्वास घेणे शक्य होत नव्हतं , लोक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सर्व घरदार सोडून रस्त्यानं पळत होती. बरीच लोक पळता पळता रस्त्यावरच मृत्युमुखी पडले.  याचा परिणाम लोकांवर इतका भयंकर होता, की ज्या ज्या लोकांपर्यंत गॅस गेला होता त्यांची त्वचा शरीर सोडायला लागली होती आणि त्यांचे डोळे वितळत होते. सकाळच्या तीन ते चार वाजेच्या सुमारास लोक जवळच्या तलावात उडी मारत होते कारण त्यांना वाटत होतं की त्यांच्या शरीराला लागलेला हा गॅस, हे केमिकल पाण्यामुळे साफ होईल.  पण त्यांना माहिती  नव्हतं की या (M.I.C. Methyl Isocyanate) सोबत  तलावाचं पाणी रेऍक्ट (React)  झाल्यामुळे ते पाणी ऍसिड मध्ये कन्व्हर्ट झालेल आहे आणि थोड्याच वेळात हा तलाव मानवी मृतदेहांनी भरून गेला होता.  

Bhopal gas tragedy causes

            हा प्रकार होण्याच्या चार तास आधी रात्री बारा वाजेच्या सुमारास कंपनीमध्ये मशीनची मेंटेनन्स व्यवस्थित मॅनेज झाला  नसल्या मुळे अचानक (M.I.C. Methyl Isocyanate) एम आय सी ने भरलेली टॅंक नंबर ई ६१० मध्ये पाणी जाण्यास सुरुवात झाली होती.  पाणी हळूहळू या एम आय सी (M.I.C. Methyl Isocyanate) ने भरलेल्या टॅंक मध्ये जाऊ लागले,  एम आय सी आणि पाणी एकत्र आल्यावर जे रसायन तयार होतं ते खूप विषारी असतं. आणि या रिएक्शन मुळे पूर्ण पाणी ४२  टन  एम आय सी ने भरलेल्या टॅंक मध्ये जाऊ लागलं, त्यामुळे खूप जोरात प्रेशर वाढू लागलं आणि बघता बघता टॅंक मध्ये प्रेशर इतकं जास्त वाढलं की टॅंक पूर्णपणे ब्लास्ट झाला. आणि त्यामधील ४२ टन एम आय सी (M.I.C. Methyl Isocyanate) हा पूर्ण वातावरणात मिक्स झाला. 

Effects of bhopal gas tragedy

            एम आय सी जेव्हा मानवी शरीरात प्रवेश करतो तेव्हा रक्ता सोबत मिक्स होऊन फुफ्फुसांवर खूप जास्त प्रेशर तयार होतं. ज्यामुळे मानव हा श्वास घेण्यास सक्षम राहत नाही. सकाळी पाच वाजेच्या सुमारास शहरात सर्व ठिकाणी रस्त्यांवर, रेल्वेस्टेशनवर, हॉटेल सगळीकडे शवांचा सडा पडला होता. या घटनेमुळे भोपाळच्या लोकांनी त्यांचे सर्वकाही गमावले होते. या घटनेमुळे दोन हजारांच्यावर लोकांचा मृत्यू हा एका रात्रीत झाला होता. जे लोक जिवंत राहिले त्यांच्या डी एन ए (D.N.A)  मध्ये एम आय सी ने प्रवेश केल्याने तो डीएनए (D.N.A.) ब्रेक झाला आणि यामुळे त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांना जन्मताच अपंगत्व स्वीकारावं लागलं होतं . ५,२०,००० पेक्षा जास्त लोक या गॅस च्या संपर्कात आले होते त्यामुळे या लोकांच्या जिन्स आणि DNA ला या गॅस ने अफेक्ट केलं होतं .

bhopal gas kand kab hua tha
1984 bhopal gas tragedy

          या गॅसच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये काही काळानंतर शारीरिक आणि मानसिक प्रॉब्लेम्स दिसायला सुरुवात झाली होती. ऑफिशियल आकड्यांनुसार  ३७८७ लोक हे या गॅस मुळे मरण पावले   होते. पण तेथील लोक असा दावा करतात की खरा आकडा हा १६ हजारापेक्षा जास्त आहे . भोपाळचे आय विटनेस म्हणतात की बहात्तर तासांच्या आत पूर्ण भोपाळमध्ये दहा हजारापेक्षा जास्त मृत शरीर हे सर्व ठिकाणी पडलेले होते. या घटनेच्या काही महिने,  वर्षानंतर अशी अवस्था झाली होती , की तेथील लोक म्हणायला लागले होते की त्या रात्री जे मृत्युमुखी पडले होते ते नशीबवान होते. जिवंत राहून वेगवेगळ्या आजारांना आम्हाला रोज सामोरं जावं लागतंय हे आमचं दुर्दैव आहे.

       या घटनेचा इम्पॅक्ट आज पण भोपाळ मध्ये बघायला मिळतो. इथे अपंगांच्या जन्मांचा आकडा  जास्त आहे. येथे जन्माला येणाऱ्या बाळांमध्ये  बहिरेपण, आंधळपण दिसून येत.  आज पण ते लोक या गॅस मुळे झालेल्या नवीन आजारांवर उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जातात. या घटनेला कारणीभूत युनियन कार्बाईड (Union Carbide India Limited) प्लांट आज पण जसाचा तसा भोपाळमध्ये जंग खात पडलेला आहे.  या घटनेच्या इतक्या वर्षानंतर सुद्धा या साईटच्या आसपास असणारे पाण्याचे स्त्रोत हे विषारी केमिकल्स ने प्रदूषित झालेले बघायला मिळतात . आजच्या वेळेत या प्लांट च्या आसपास राहणाऱ्या लोकांना जे  पाणी मिळत ते  आज पण विषारी केमिकलयुक्त आहे फक्त प्रमाण खूप कमी आहे.

Bhopal gas tragedy company

             या घटनेनंतर नुकसान भरपाई म्हणून युनियन कॅरबाईड (Union Carbide India Limited)  चे चेअरमन वॉरेन अँडरसन यांनी २४ फेब्रुवारी १९८९ ला सातशे करोड रुपये भारत सरकारला नुकसान भरपाई म्हणून दिले होते. पण जीव गमावलेल्या लोकांची नुकसान भरपाई करणार तरी कशी. 

                    तुम्हाला माहिती आवर डली असेल तर शेअर करा आणि आमच्या इंस्टाग्राम पेज अद्भुत तथ्य मराठी ला फॉलो करा. या  केस बद्दल निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिलेली आहेत.   धन्यवाद!!!

Questions & Answers ( Q&A) 

Q.1 Bhopal gas tragedy date
Ans 2-3 December mid night

Q.2 Which chemical was responsible for Bhopal gas tragedy?
Ans Methyl Isocyanate (M.I.C) was responsible for Bhopal gas tragedy.

Q.3 Which poisonous gas was located during Bhopal gas tragedy?
Ans Methyl Isocyanate (M.I.C) 

Q.4 Which factory responsible for Bhopal gas tragedy?
Ans Union Carbide India Limited factory is responsible for Bhopal gas tragedy.