Why marriages failing in Indian | Why marriages fail in India | Why Marriages don't work nowadays | Digital Infopedia 

        सध्याच्या लव्ह मॅरेजच्या जमान्यात आजही अनेक जण असे आहेत जे अरेंज्ड मॅरेजवर विश्वास ठेवतात. खासकरून मुली ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य करियरला वाहीलेलं असतं, त्यांना अजिबात प्रेमात पडायला वगैरे वेळ मिळालेला नसतो किंवा आई वडिलांच्या मर्जी विरुद्ध लग्न करायचं नसतं, त्या मुलींची अरेंज्ड मॅरेज करून छानसा जोडीदार निवडायची इच्छा असते. आज त्याच मुलींना उपयोगी पडेल असा हा लेख Digital Infopedia तुमच्यासाठी घेऊन आले आहे.. ज्यात आम्ही सांगणार आहोत काही असे प्रश्न जे अरेंज्ड मॅरेज करू इच्छीणाऱ्या प्रत्येक मुलीने आपल्या भावी जोडीदाराला अर्थात मुलाला विचारायला हवेत आणि मगच त्याची निवड करायला हवी. कारण शेवटी लग्न म्हणजे आयुष्यातील सगळ्यात मोठा निर्णय असतो. हा निर्णय चुकला तर सगळं आयुष्य उध्वस्त होऊ शकतो. म्हणूनच त्या आधी काही शहानिशा करून मग सारासार विचार करून निर्णय घेतलेला योग्य!
Why marriages failing in Indian
Why marriages fail in India
Why Marriages don't work nowadays

        पहिली गोष्ट जे लग्न आहे हे युवा वर्गासाठी आणि खास करून जे लग्न करणार आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे.कारण या एका निर्णयामुळे त्या व्यक्तीचे पुढचे आयुष्य अवलंबून असते. लग्न ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही लग्नाचा निर्णय एक दोन महिन्यांत नाही घेऊ शकत. जर तुम्हाला वाटत असेल समोरील  व्यक्ती चांगली आहे आणि सर्व ठीक आहे तर चला लग्न करूया  तर हे पुर्णतः चुकीचे आहे आणि ही गोष्ट अरेंज मॅरेज मध्ये पण लागू होते. जर तुम्ही विचार करत असाल की घरचे बघतील तर चांगलाच बघतील आणि आपल्या घरचे आपलं वाईट नाही बघणार पण ही गोष्ट जरी खरी असली तरी आजच्या काळात तुम्ही कोणत्याही व्यक्ती ला कमी वेळेत ओळखू नाही शकत  आणि जर तुम्ही विचार करत असाल की अरेंज मॅरेज मध्ये मुलगी ही लग्न निभावते तर हे आताच्या काळात पूर्णतः चुकीचे समज आहे.

Why marriages fail in India

        भारतीय लग्नांबद्दल झालेल्या एका रिसर्च नुसार 70 ते 80% लग्न या साठी टिकून राहायचे कारण तेव्हा मुली या त्यांच्या अधिकाराबाबत जागृत नव्हत्या आणि ज्या काही शिक्षित होत्या त्या सुद्धा समाज काय म्हणेल यामुळे गप्प बसायच्या आणि अत्याचार आणि त्रास सहन करत असत त्यामुळे लग्न हे दीर्घकाळ चालायचे. पण आता च्या काळात आजची मुलगी ही  अन्याय सहन करत नाही आणि हे माझ्यामते तरी योग्य आहे. मागील काळात मुलींवर लग्नानंतर हिंसा, अत्याचार आणि वाईट वागणूक दिली जात होती त्यामुळे आजचा काळ हा खूप चांगला आहे की प्रत्येक मुलगी ही अन्याय सहन नाही करत.

        अन्याय होत असेल तर सहन करणे ही एक बाजू आहे आणि दुसरी बाजू म्हणजे आज काही युवा हे डोक्याने विचार नाही करत , ते मनाने विचार करतात आणि सर्व ठीक आहे असं समजून लग्न करतात पण खरी मजा आता इथून सुरू होते. लग्न केल्यानंतर आता एकमेकांच्या खऱ्या सवयी समजायला सुरुवात होते. कारण बघा काही वेळेपर्यंत प्रत्येक व्यक्ती ही चांगली असते आणि जसा जसा वेळ जातो त्या व्यक्ती मधील वाईट गुण हे कळायला लागतात.

        माझ्यामते अरेंज मॅरेज मध्ये पण मुलगा मुलीला भेटू द्यायला पाहिजे कारण, एक दोन भेटीमध्ये कोण स्वतः चा वाईटपणा दाखवेल? जर तुम्ही मला कुठे  1 - 2 वेळा भेटले तर आपण सुद्धा चांगलेपणा दाखवू आणि चांगल्या चांगल्याच गोष्टी करू, सभ्य वर्तन करू आणि जेव्हा आपल्या भेटी वाढतील तेव्हा योग्य खरेपणा बाहेर येतो. खरेपणा बाहेर आल्यावर असे नाही की समोरील व्यक्ती तुमच्या सोबत वाईट करेल . मानसशास्त्र मध्ये असे म्हणतात  की जर तुम्हाला कोणाला ओळखायचे असेल तर त्या व्यक्ती ला बोलू द्या. त्या व्यक्तीची बोली त्या व्यक्तीचा स्वभाव दर्शवते.

Why love marriages fail in India

        लग्न करतांना स्वभाव हा खूप महत्त्वाचा घटक आहे. तुम्ही जेव्हा पण लग्न कराल तेव्हा त्या व्यक्तीचा स्वभाव  ओळखायला शिका. जेव्हा स्वभाव ओळखता येत नाही किंवा स्वभाव ओळखायला  वेळ नाही मिळत तेव्हा भविष्यात जेव्हा खरेपणा समोर येतो तेव्हा मूल आणि मुली म्हणतात की आता हे नातं नाही टिकू शकत. पण हा विचार तुम्ही आधी करायला पाहिजे होता. जितक्या घाई ने तुम्ही लग्न केले त्या प्रकारे तुम्ही खरंच समोरच्या व्यक्ती ला ओळखतात का? याकडे सुद्धा थोडं लक्ष दिले पाहिजे.

         तुम्ही घाई घाई मध्ये निर्णय घेतले आणि तुम्हाला समजलं आता सर्व ठीक आहे. तुम्ही घरच्यांना सांगितले तुम्हाला समोरील व्यक्ती आवडली ती व्यक्ती चांगली आहे आणि या निर्णयानुसार तुमचे घरचे तुमचे लग्न लावतात आणि लग्न झाल्यानंतर 6 महिने ते 1 ते 2  वर्षांनंतर तुम्ही घरच्यांना म्हणतात की तेव्हा मला चांगले वाटले होते! २आता मला हे नातं संपवायचे आहे. हे असे चुकीचे आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ द्या वेळेनुसार समजून घ्या. फक्त कोणाचा चांगलेपणा बघून लग्न नाही करता येत.

        अस म्हणतात की चांगल्या गोष्टींवर प्रत्येक व्यक्ती प्रेम करतो मग ते प्रेम थोडी आहे. समजा अजय चा स्वभाव हा खूप चांगला आहे त्यामुळे तो वंदना ला आवडला आणि अजय च्या स्वभावामुळे तो बाकी लोकांना सुद्धा आवडला तर अजय मध्ये अशी काय विशिष्ट गोष्ट आहे की त्याला तुम्ही लग्नासाठी निवडाल. पण जर वंदना ला अजय मधील वाईटपणा सुद्धा स्वीकार असेल तर मग तो लग्नासाठी योग्य आहे आणि वंदना अजय सोबत तिचं आयुष्य जगू शकते.

        लग्न म्हणजे काही दिवस भेटणे नव्हे, तर लग्न म्हणजे आयुष्यभर एका घरात एकमेकांसोबत राहणे आहे. प्रत्येक रूपाने एकमेकांना बघितले गेले पाहिजे, चांगले असो , वाईट असो, राग असो, प्रेम असो, चिंता असो, या सर्व गोष्टी समजून घेतल्या गेल्या पाहिजे. यासर्व गोष्टी साठी त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखा आणि जर तुम्ही त्या व्यक्तीच्या स्वभावाला स्वीकार करू शकत असाल तरच लग्न करा आणि स्वभाव स्वीकारू शकत नसाल तर थोडा वेळ द्या. घाई करू नका कोणत्याही गोष्टीची घाई ही कधीच चांगली नसते. मग ते पैसे कमावणे असो, लग्न करणे असो , परिवार किंवा नातं असो. कारण शॉर्टकट्स हे फक्त शॉर्ट वेळेपर्यंत मर्यादित असतात. तुम्हाला तुमचा मनपसंद जीवनसाथी पाहिजे असेल तर त्यासाठी तुमच्याकडे धैर्य, वेळ आणि विचार या तीन गोष्टी पाहिजे.

      लग्न करतांना दोघांमधील अंतर सुद्धा हे फार जास्त नसावे कारण वैज्ञानिक दृष्ट्या दोन व्यक्तिमधील जर वय जास्त असेल तर त्यांचा विचार करण्याचा दृष्टिकोन हा सुद्धा वेगळा असेल हे पहिले नुकसान. वय जास्त असल्यामुळे दुसरे नुकसान म्हणजे प्रेग्नन्सी. केव्हा केव्हा पुरुषाचे वय जर जास्त असेल 32 ते 35 च्या आस पास असेल आणि मुलीचे वय 25 ते 30 असेल तेव्हा काही केसेस मध्ये  प्रेग्नन्सी मध्ये Difficulty येऊ शकते. वय जास्त असल्याचे तिसरे नुकसान म्हणजे लग्नानंतर होणारे मतभेद आणि एकटेपणा जानवल्यामुळे extra marital affair हे सुरू होतात. या सर्व गोष्टीमुळे शेवटी लग्न हे घटस्पोट च्या स्तिथी ला येते.

         या नंतरअजून एक मुद्दा येतो , जो की आजच्या काळात विशेष महत्वाचा वाटत नाही . किंबहुना लोकांचा त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोनपुर्णपणे वेगळा झाला आहे , आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. तो मुद्दा , ती गोष्ट कोणती असेल? तर ती म्हणजे " जात". मुळातच जात हा घटक लग्नात यायलाच नको , पण या मुद्द्यात पण एका " पण" ला जागा आहेच. लग्न ही गोष्ट फक्त मुलाला मुलगी आवडली आणि मुलीला मुलगा आवडला आणि लग्न झालं आणि त्या दोघांचा सुरळीत संसार सुरू झाला यापर्यंतच मर्यादित नसतं. एका मुलीच आणि एका मुलाच लग्न खरं तर कितीतरी नवीन नात्यांना बनवतं. लग्न या दोन लोकांचं लग्न दोन परिवार जोडण्याच काम करत असत. आणि मग जर तुम्ही आंतरजातीय विवाह करत असाल तर खर तर ती खुप चांगली गोष्ट आहे, पण हे लग्न करताना मुलगा आणि मुलगी दोघांनीपण आधी विचार करायला पाहिजे की आपण त्या परिवारात मिळून मिसळून राहू शकू का? त्यांच्या चाली रीती त्यांचा पुरातन वारसा आपण पुढे नेऊ शकू का? त्यांच्या अपेक्षा आपण 100% नाही तर निदान 50% तरी पूर्ण करू शकू का? जर या प्रश्नांची उत्तरं 'हो' असतील तर तुमची गाडी नक्कीच सुरळीतपणे रुळावर चालेल, पण जर या प्रश्नांची उत्तरं 'नाही ' मध्ये असतील तर मग भांडणं, राग , चिडचिड, गैरसमज, एकमेकांविषयीची नाराजगी हे पाहुणे तुमच्या संसारात अगदी सहजच प्रवेश करतील आणि या मुळे कदाचित तुमच्या नात्याला तुम्हाला पूर्णविराम द्यावा लागेल.

  Why Marriages don't work nowadays

        फक्त प्रेम आहे म्हणून किंवा घरी सगळंच अगदी व्यवस्थित आहे आणि आई वडिलांच्या सल्ल्याने केलंय म्हणुन ते नात टिकवून राहील किंवा चांगलं राहील हा समाजात असणारा एक गोड गैरसमज आहे . 'लग्न' हे फक्त अडीच अक्षरी नाव  तुमचं पूर्ण आयुष्य बद्दलवण्याची हिम्मत ठेवत. प्रत्येकाची आवड, निवड आणि सवड या सर्वच गोष्टी वेगळ्या वेगळ्या असतात.त्यामुळे एकाने जर एखाद्या ठराविक विचार करून लग्न केलं म्हणून तुम्ही पण तोच विचार करून लग्न करायचं ठरवलं तर तुमचा निर्णय चुकीचा होऊ शकतो. आधी स्वतःला मग समोरच्याला समजून आणि या सगळ्या गोष्टींचा विचार विवेचन करूनच मग लग्न केलेलं नेहमी उचीत....

       तुमची तुमच्या करिअर बद्दल काय विचार केला आहे ? लग्नानंतर फॅमिली प्लांनिंग कशी कराल ? लग्नानंतर नोकरी करण्यास सहमती असेल का ?  पारिवारिक स्तिथी मध्ये कसे सांभाळाल ? लग्नाआधी असलेले आजार कोणते ? हे सर्व प्रश्न लग्न करतांना तुम्ही तुमच्या भावी जोडीदाराला नक्की विचारले पाहिजे. 

            तुम्हाला माहिती कशी वाटली ते खाली कमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हला जर रोज नवीन नवीन माहिती आणि facts जाणून घ्यायचे असतील तर इंस्टाग्राम ला आजच अद्भुत तथ्य मराठी ला फॉलो करा .. धन्यवाद !!

See our other posts