History of Swami Vivekananda in marathi | Story of Swami Vivekananda in Marathi | Life of Swami Vivekananda by eastern and western disciples | Digital Infopedia

            Sisters and Brothers of America फक्त या 5 शब्दांनी Parliaments of the World Religions साठी आलेल्या 7000 लोकांना 2 मिनिट उभे राहून टाळ्या वाजवण्यास भाग पाडले, ज्यांची पुकार अजूनही स्वामी विवेकानंदांच्या ज्ञान आणि आदर्शांची साक्ष देते.  तेच स्वामी विवेकानंद ज्यांनी भारताच्या तरुण पिढीला, जे इंग्रजांच्या गुलामगिरीच्या साखळीत अडकले होते त्यांना सांगितले की, "उठो जागो और तब तक नहीं रुको जब तक तुम अपनी मंजिल को हासिल ना कर लो" आणि या वाक्याने भारतातील लाखो लोकांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यास मदत केली आणि आजही मदत करत आहे.  पण ते म्हणतात ना की आयुष्य प्रत्येकाची परीक्षा घेते, म्हणून स्वामी विवेकानंदांनीही अनेक परीक्षा दिल्या.  आयुष्यात त्यांनी प्रत्येक अडथळे पार केले, लोकांचे टोमणे ऐकले, दिवसेंदिवस भुकेले आणि तहानले राहिले. पण प्रत्येक वेदना सहन केल्यानंतरही त्यांनी त्यांच्या मनावर आणि Mind वर कसे नियंत्रण ठेवले? त्यांनी स्वत: ला कसे पराभूत होण्यापासून वाचवले?  काय होती स्वामी विवेकानंदांच्या जीवनाची कथा? चला Digital Infopedia सोबत  जाणून घेऊया. the life of swami Vivekananda.

life of swami vivekananda
history of swami Vivekananda in Marathi

Childhood life of Swami Vivekananda

Swami Vivekananda date of birth

Swami Vivekananda Parents

                ज्या व्यक्तीने आपल्या वेदांचा, पुराणांचा, आपल्या अभिमानाचा इतिहास जगाच्या पाठीवर आणला होता ते दुसरे तिसरे कोणी नसून स्वामी विवेकानंद होते. ज्यांचा बंगाल मधील कोलकात्यातील बंगाली कुटुंबात 12 जानेवारी 1863 रोजी भारताच्या मातीत  जन्म झाला. त्यांचे वडील विश्वनाथ दत्ता आणि आई भुवनेश्वरी देवी यांनी त्यांचे नाव लहानपणी नरेंद्रनाथ दत्ता ठेवले होते आणि प्रत्येकजण त्यांना प्रेमाने नरेंद्र म्हणत असत आणि त्यांच्या कुटुंबाला कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती.  कारण, नरेंद्र ची आई एक धार्मिक स्त्री असण्याव्यतिरिक्त नरेंद्रची आई एका चांगल्या पत्नीचा धर्म सुद्धा पार पाडत असे आणि घराच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असे.  त्याचवेळी नरेंद्रचे वडील कोलकाता उच्च न्यायालयात वकील होते आणि नरेंद्रचे आजोबा संस्कृत आणि फारसीचे महान अभ्यासक होते.

            वयाच्या 25 व्या वर्षी त्यांनी आपले कुटुंब सोडून साधू-संताचे जीवन स्वीकारले. म्हणजेच, नरेंद्र सोबत अध्यात्म आणि ज्ञान या दोघांचा संबंध ते स्वामी विवेकानंद होण्याआधीच त्याच्याशी जोडले गेले होते आणि कदाचित याच कारणामुळे नरेंद्रला लहानपणापासूनच आध्यात्मिक गोष्टींमध्ये आणि नवीन गोष्टी शिकण्यात रस होता आणि त्यांनी त्यांच्या आई वडिलांकडून इतरांना समजून घेणे, इतरांना प्रेम करणे, इतरांना मदत करणे या सर्व गोष्टी शिकले.  पण श्रीमंत, गरीब आणि हिंदू मुस्लिम यातील फरक त्यांना समजला नाही.  जसे की एकदा नरेंद्रने वडिलांच्या कार्यालयात ठेवलेल्या हिंदूंसाठी वेगळे आणि मुस्लिमांसाठी वेगळे दोन सिगार बॉक्समधून एक एक करून सिगार काढले व ते वेगळे वेगळे सिगार ते पिले. आपल्या लहान मुलाला हे करताना पाहून त्याचे वडील त्याला काहीतरी सांगायच्या आधी नरेंद्र म्हणाला, मला हिंदू आणि मुस्लिम दोघांचे सिगार सारखेच आढळले, ते ऐकून नरेंद्रचे वडील आपल्या मुलाच्या समजदारी पुढे काही बोलू शकले नाहीत.  पण नरेंद्र चे वडील त्यांना बोलले पण काय असते, कारण नरेंद्रने 100% सत्य सांगितले होते.

            त्यांच्या खऱ्या मनाच्या खऱ्या विचाराने नरेंद्रने वयाच्या 8 व्या वर्षी मेट्रोपॉलिटन इंस्टीट्यूशन मध्ये शिकण्यासाठी 1871 मध्ये प्रवेश घेतला आणि नंतर 1879 मध्ये त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये अभ्यास सुरू ठेवला आणि लहानपणापासूनच नरेंद्र संगीत आणि अभ्यासात व्यस्त होते. एवढेच नव्हे तर या दोन्ही ठिकाणी नरेंद्र यांना खुले विचार समजणारे आणि समजावून सांगणारे लोक मिळाले. त्यांच्या संगतीत, नरेंद्र जेव्हा मेट्रोपॉलिटन इंस्टीट्यूशन मध्ये शिकत होते, तेव्हा तेथील प्रमुख ईश्वरचंद्र विद्यासागर होते. ही तीच व्यक्ती आहे ज्यांनी त्या वेळी विधवांना पुनर्विवाह करण्याचे स्वातंत्र्य दिले होते.  पण एवढेच नाही तर त्यांच्या विचाराची व्याप्ती वाढवण्यासाठी स्वामी विवेकानंदांना पुस्तके वाचायला आवडायची.  एकीकडे ते धर्म, इतिहास, गीता रामायण सारखी पुस्तके वाचत होते आणि दुसरीकडे ते David hume, Johann Gottlibe Fichte's, The Principal of Ethics, History आणि Spirituality सारखी पुस्तके वाचत होते.

            ज्यामुळे त्याच्या मनात देवाबद्दल अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आणि कदाचित हेच कारण होते, नरेंद्र वेगवेगळ्या मिशन आणि समाजात गुंतले. जसे की केशवचंद्र सेन यांच्या नवाब विधान या मिशन चे म्हणणे होते की प्रत्येक धर्म सत्य आहे. ब्राह्मो समाज मिशन, या मिशन चे असे म्हणणे होते की विश्वास अंधश्रद्धेत नाही तर तुमच्या विचारसरणीवर विश्वास ठेवा, एका देवावर विश्वास ठेवा आणि जगभरात सहिष्णुता आणि बंधुता पसरवा.  शिवाय, नरेंद्र ने Freemasons आणि Western Esoteric Tradition मिशनमध्येही भाग घेतला.  परंतु अभ्यासाबरोबरच त्यांना त्यांच्या गोंधळलेल्या मनाच्या न सुटलेल्या सर्व अध्यात्मिक प्रश्नांची उत्तरे श्री रामकृष्ण परमहंस यांना भेटल्यानंतरच कळली.

life of swami vivekananda
Shri Ramakrishna Paramhans

        कारण जेव्हा नरेंद्रने श्री राम कृष्णाला विचारले की तुम्ही देव पाहिला आहे का, तेव्हा श्री रामकृष्णांनी उत्तर दिले की होय!  मी पाहिलं आहे की, जसे मी तुला बघतोय त्याप्रमाणे मी देवाला स्पष्टपणे पाहिले आहे.  फक्त मी देवाला सखोल अर्थाने पाहिले आहे आणि अश्याप्रकारे श्री रामकृष्ण परमहंस यांनी नरेंद्रला देवाशी जोडले.  त्यानंतर नरेंद्रने त्यांना आपला गुरू म्हणून स्वीकारले होते, परंतु नरेंद्रच्या जीवनातील या एका पैलूमध्ये, जिथे प्रकाशच प्रकाश होता, तर दुसरीकडे, 1884 मध्ये, 21 वर्षाचे स्वामी विवेकानंद, ज्यांचे शिक्षण पूर्ण झाले नव्हते आणि त्यांचे B.A हे संपणारच होते, त्याचवेळी देवाने त्यांच्या वडिलांना हिसकावून त्यांचे आयुष्य अंधकारमय केले.

    
    दुसरो का दुख समझना आसान नहीं।
जब तक आप खुद उस दुख से ना गुजरे हो। 
आणि कदाचित नरेंद्रला स्वामी विवेकानंद होण्यासाठी, आयुष्याच्या या कटू प्रवासाचा टप्पा ओलांडणे देखील आवश्यक होते. वडिलांच्या निधनानंतर नरेंद्रला कळले की गरिबी म्हणजे काय असते ? त्यांना कळले की उपाशी राहणे म्हणजे काय असते? जेव्हा नरेंद्र आपल्या कुटुंबाच्या डोक्यावरून कर्जाचा बोजा उचलण्यासाठी नोकरी शोधत होते, तेव्हा त्यांना कळले की एका कार्यालयातून दुसऱ्या आणि दुसऱ्या ते तिसऱ्या कार्यालयात भटकणे काय असते?  ठोकर लागणे म्हणजे काय असते ? नरेंद्र च्या आयुष्याच्या या नव्या टप्प्यावर कोणीही त्यांच्यासोबत नव्हते.  त्यांचे नातेवाईक जमिनीच्या विभाजनासाठी लढू लागले आणि अशा परिस्थितीत त्यांची अपेक्षा ही ढासळत होती  पण त्यावेळी एक गोष्ट त्यांना स्पष्टपणे समजली होती.

        ती गोष्ट म्हणजे, या जगात गरीब आणि असहाय लोकांसाठी कोणतेही स्थान नाही आणि कदाचित ते त्या लढ्यात हार मानतील पण अशा परिस्थितीत त्यांना श्री रामकृष्ण परमहंस यांनी पाठिंबा दिला आणि त्यांचा देवावर कमी होत असेल विश्वास वाढविला आणि त्यांना अधिक आधार दिला आणखी मजबूत केले.  एके दिवशी जेव्हा नरेंद्रने श्री रामकृष्णांना स्वतः साठी पूजा करण्यास सांगितले, तेव्हा श्री रामकृष्णांनी स्वतः त्यांना जाऊन पूजा करण्याचा सल्ला दिला.  नरेंद्र जेव्हा काली मातेसमोर पोहचले, तेव्हा त्यांच्या समस्यांचे समाधान मागण्याऐवजी, त्यांनी विवेक अर्थात ज्ञान आणि वैराग्य म्हणजेच मोह मायेच्या पलीकडे जाण्याची मागणी मागितली आणि हा तोच दिवस होता जेव्हा नरेंद्र ने पूर्ण आध्यात्मिक जागरूकता प्राप्त केली.

          यानंतर, दिवसभर नरेंद्र आपल्या कुटुंबासाठी दोन वेळची भाकर जुडवण्यात व्यस्त असे,  पण रात्र होताच ते सर्व त्यांचे गुरु श्री रामकृष्ण यांच्याकडे जात होते आणि  त्यांच्या शिष्यांना प्लेटो, एरेस्टोटल, बुद्ध आणि हेगल सारख्या लोकांबद्दल सांगत होते.  पण लवकरच नरेंद्रच्या आयुष्यात आणखी एक वळण आले. 16 ऑगस्ट 1886 रोजी जेव्हा त्यांच्या गुरूंनी देखील या जगाचा निरोप घेतला. नरेंद्र पुन्हा एकदा एकटे पडले.  पण यावेळी त्याच्यावर इतर शिष्यांचीही जबाबदारी होती आणि म्हणूनच त्यांनी या शिष्यांसोबत राहायला सुरुवात केली आणि ते ज्याठिकाणी राहत होते त्या स्थानाला रामकृष्ण मठ असे संबोधले जाऊ लागले आणि नंतर 1886 मध्ये त्यांनी मठ सोडला आणि लोकांना समजून घेण्यासाठी, त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी भारताच्या कानाकोपऱ्यात जायला सुरुवात केली आणि शपथ घेतली की ते सर्व देशातील लोकांच्या भल्यासाठी काम करतील आणि वेळ आली तर प्राणांची आहुती देणारं.  परंतु कोणत्याही परिस्थितीत या लोकांना त्रासांपासून दूर करतील.

        स्वामी विवेकानंदांना स्वतःला माहित नाही पडलं की त्यांनी आपल्या जीवनाचा मौल्यवान वेळ लोकांना देऊन 5 वर्षे कशी मदत केली. त्यानंतर एक दिवस शिकागोमध्ये आयोजित होणाऱ्या World कोलंबियन एक्सपोजिशन बद्दल माहिती झाली आणि स्वामी विवेकानंद तेथे गेले, भारत, हिंदू धर्म आणि त्यांचे गुरु श्री रामकृष्ण, त्यांचे वेदांत यांचे तत्वज्ञान लोकांमध्ये मांडले. आपण वेदांताचे सार या एका ओळीत समजू शकतो या हम ब्रह्मास्मी त्वम् च.  याचा अर्थ देव आणि मनुष्य एकच आहेत.  उदाहरणार्थ, हिंदू धर्म, इस्लाम, ख्रिश्चन सारख्या धर्मात देव-केंद्रित दृष्टिकोन आहे.  आपण देव शोधतो, त्याची उपासना करतो आणि बौद्ध आणि जैन धर्मात देव शोधण्याऐवजी आपल्याला स्वतःमध्ये सत्य लपलेले दिसते म्हणजे तो मानव केंद्रित दृष्टिकोन आहे आणि वेदांत हा एकच धर्म आहे, जो दोघांनाही देव मानतो म्हणजेच देव-केंद्रित दृष्टिकोन आणि मानव केंद्रित दृष्टिकोन.

        म्हणजेच, जेव्हा आपण देव शोधतो, शेवटी आपल्याला आपल्या आत सत्य सापडते आणि जेव्हा आपण आपल्या आत सत्य शोधतो तेव्हा आपल्याला देव सापडतो कारण दोन्ही एक आहेत आणि हे स्वामी विवेकानंदांनी 31 मे 1893 रोजी शिकागोला समजावून सांगितले. त्यांच्या शिष्यांनी काही प्रकारे पैसे गोळा केले होते आणि तुम्हाला माहिती आहे का?  त्याच वेळी, स्वामी विवेकानंदांना हे नाव मिळाले जे त्यांना खेत्रीचे महाराजा अजित सिंह यांनी दिले होते, ज्याचा संस्कृतमध्ये अर्थ होतो कि विवेक म्हणजे ज्ञान आणि आनंद म्हणज सुख आणि त्याआधी स्वामी विवेकानंद स्वतःला सच्चिदानंद म्हणत असत.

Swami Vivekananda at the Worlds Parliament of Religions, Chicago, 1893
Swami Vivekananda at the World Parliament of Religions, Chicago, 1893

swami Vivekananda speech in Chicago

            आता त्यांच्या शिकागोच्या प्रवासाबद्दल बोलूया, जो 11 सप्टेंबर 1893 रोजी  जपान, चीन, कॅनडा मधून आणि नंतर त्यांना भाषण न देण्याच्या अनेक लोकांच्या प्रयत्नांना सामोरे जाऊन World Parliament of Religions मंचावर संपला, त्यांनी Sisters and Brothers of America असे म्हणून भाषणाला सुरुवात केली तेव्हा तेथे उपस्थित 7000 लोकांनी 2 मिनिटे उभे राहून ओव्हेशन दिले आणि टाळ्या वाजवत राहिल्या.  तेथे त्यांनी लोकांना वेदांत आणि हिंदुत्वाच्या तत्त्वांविषयी सांगितले.  त्या काळातील न्यूयॉर्क क्रिटिक पेपरमध्ये स्वामी विवेकानंदांच्या भाषणाबद्दल असे काहीतरी लिहिले गेले होते, बऱ्याच लोकांनी खूप चांगले भाषण दिले, पण कोणीही त्या हिंदू साधूसारखे बोलू शकले नाही.  त्यांनी हे देखील लिहिले की ते त्यांचे संपूर्ण भाषण छापत आहेत, परंतु भाषणाचा तेथे उपस्थित लोकांवर जो परिणाम झाला, त्याचे वर्णन शब्दात करणे अशक्य आहे आणि स्वामी विवेकानंदांच्या या भाषणानंतर ते थांबले नाहीत.

        पुढील 4 वर्षे त्यांनी अमेरिका आणि यूके मध्ये त्यांचे तत्त्वज्ञान, त्यांचा विश्वास यावर व्याख्यान दिले.  लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला. या काळात त्यांनी न्यूयॉर्कच्या वेदांत सोसायटीची स्थापनाही केली आणि त्यानंतर 1897 मध्ये जेव्हा ते भारतात परतले तेव्हा त्यांना भारतातील लोकांचे प्रेम आणि आदरातिथ्य दोन्ही मिळाले. कोलकाता गाठल्यानंतर त्यांनी अनेक भाषणे दिली. स्वामी विवेकानंदांनी 1 मे 1897 रोजी बेलूर मठाजवळ रामकृष्ण मिशन सुरू केले, ज्याचा एकच उद्देश होता. कर्मयोगाच्या आदर्शांचे अनुसरण करण्यास लोकांना शिकवणे आणि मदत करणे.

Vedanta Society of New York
Vedanta Society of New York

Swami Vivekananda death reason

            हे स्पष्ट करण्यासाठी स्वामी विवेकानंद हे सुद्धा सांगत असत की गीता लक्ष्यात  ठेवण्यापेक्षा फुटबॉल खेळून तुम्ही स्वर्गाच्या अधिक जवळ जाल, याचा अर्थ असा नाही की ते गीता वाचण्यास नकार देत होते.  किंबहुना, त्यांचा असा विश्वास होता की केवळ गीता लक्षात ठेवल्याने काही होणार नाही, जर तुम्ही त्याऐवजी फुटबॉल खेळत असाल तर तुम्ही कर्म करत आहात आणि कर्म करणे हे फक्त गीता लक्षात ठेवण्यापेक्षा चांगले आहे.  याशिवाय, त्यांनी अस्पृश्यता समाप्तीला आणि आंतरजातीय विवाहाला देखील तितकेच समर्थन दिले, जितके त्यांनी आपल्या देशातील नवीन तरुणांना पुढे जाण्यासाठी आणि काहीतरी करून दाखविण्यास सांगितले.  पण या सगळ्यामध्ये एक वाईट बातमी आली.  वयाच्या 39 व्या वर्षी जेव्हा त्यांना कळले की त्यांना दमा आहे आणि अशा परिस्थितीत त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत गेली.

Swami Vivekananda Death date

बेलूर मठात राहताना, त्यांना समजले की कदाचित ते 40 वर्षे जगू शकणार नाही.  यामुळे, त्यांनी आपल्या मठाच्या मोठ्या साधू ला सांगितले की, त्याच मठाच्या भूमीत माझे अंतिम संस्कार करायचे आहेत.  प्रत्येकजण त्यांच्यासाठी खूप दुःखी होता.  पण काळाच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही आणि 4 जुलै 1902 रोजी स्वामी विवेकानंद हे जग सोडून निघून गेले.

life message of swami Vivekananda on character building

ज्या गोष्टी मागे राहिल्या , ते त्यांनी शिकवलेले आदर्श होते, जे आजही भारतातील लोकांच्या हृदयात जिवंत आहेत आणि अजूनही लोकांना चांगले भविष्य, चांगले जीवन आणि एक चांगले मानव म्हणून प्रेरणा देत आहेत.  एपीजे अब्दुल कलाम यांनी स्वामी विवेकानंदांविषयी केलेल्या भाषणात  स्वामी विवेकानंद म्हणतात की माझे नाव मोठे असू नये.  मला माझे विचार मोठे करायचे आहेत जेणेकरून लोक ते समजून घेतील आणि त्याचे अनुसरण करतील आणि आनंदी जीवन जगतील. असे होते स्वामी विवेकानंद त्यांनी जगाच्या नकाशावर हिंदुत्वाचा झेंडा उंचावला आणि शेवटच्या क्षणापर्यंत लोकांची सेवा करत राहिले. 


मित्रानो,  तुम्ही स्वामी विवेकानंदाकडून खूप काही शिकू शकतात, जसे कि मानव त्याच्या विचारांच्या  जोरावर जगात काहीही मिळवू शकतो, वाईट परिस्तिथी मध्ये खचून न जाता संकटातुन बाहेर निघण्याचा मार्ग शोधावा, आणि बरेच काही गोष्टी आपण स्वामी विवेकानंद कडून शिकू शकतो. तुम्हाला पोस्ट कशी वाटली आम्हला कमेंट मध्ये कळवा. तुम्हला रोज नवीन नवीन तथ्य माहिती करायचे असतील तर आजच आमच्या इंस्टाग्राम पेज अद्भुत तथ्य मराठी ला फॉलो करा. धन्यवाद!!!

See our other posts